अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स ना प्रोत्साहन अनुदान
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स ना प्रोत्साहन अनुदान आणि पुरस्कार दारिद्र्यरेषेखालील मुलींना संगणक ज्ञानाची तरतूद, हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती
जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये महिला आणि बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून राबवल्या जाणाऱ्या योजनांअंतर्गत आता तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहासाठी ७हजार रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय. या व्यतिरिक्त मुलींना स्वसंरक्षणासाठी आणि शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण योजनेमध्ये ज्युदो, कराटे, योगा, आणि जीवन कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी ६०० ऐवजी १ हजार रुपये वाढवून देण्यात येणार असेही मुश्रीफ म्हणाले. तसेच ७वि ते १२ वि पास मुलींना संगणकाचे ज्ञान, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ आता, दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील मुलींना देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंब उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजारांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मुश्रीफ म्हणाले, बालवाडी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, अशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत रस्ताही वार्षिक १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. बालवाडी आणि अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि आशा वर्कर्स यांना आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर काम कारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार आणि ५ ते १० हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.