जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये महिला आणि बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून राबवल्या जाणाऱ्या योजनांअंतर्गत आता तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहासाठी ७हजार रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय. या व्यतिरिक्त मुलींना स्वसंरक्षणासाठी आणि शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण योजनेमध्ये ज्युदो, कराटे, योगा, आणि जीवन कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी ६०० ऐवजी १ हजार रुपये वाढवून देण्यात येणार असेही मुश्रीफ म्हणाले. तसेच ७वि ते १२ वि पास मुलींना संगणकाचे ज्ञान, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ आता, दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील मुलींना देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंब उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजारांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मुश्रीफ म्हणाले, बालवाडी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, अशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्म
