क्रेडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्या उद्घाटन
अहिल्यानगर : बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या अहिल्यानगर शाखेने आयोजित केलेल्या क्रेडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान हे प्रदर्शन होत आहे. तीन दिवसांचे हे रिअल इस्टेट भव्य गृह प्रदर्शन सावेडी रस्त्यावरील सारडा महाविद्यालयाच्या प्रशस्त जागेत होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी पाच वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर सूर्यनारायण पांड्ये यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती क्रेडाईचे अहिल्यानगरचे अध्यक्ष अमित मुथा व सेक्रेटरी प्रसाद आंधळे यांनी दिली. या प्रदर्शनात १५० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. यात प्रथितयश बिल्डर्स व डेव्हलपर्सचे सुमारे ४० स्टॉल, बँक्स, होम फायनान्स कंपनी, बांधकाम मटेरियल ट्रेडर्स असणार आहेत. प्रदर्शनात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी असेल. याशिवाय विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, फूड कोर्ट असल्याने ग्राहकांना निवांत वातावरण आहे. व्यवस्था क्रेडाई अहमदनगरचे प्रेसिडेंट इलेक्ट गिरीश अग्रवाल, उपाध्यक्ष अमित वाघमारे व सागर गांधी, खजिनदार दीपक बांगर, माजी अध्यक्ष संजय गुगळे, आदींसह सर्व सदस्य पाहत आहेत.