गुंडेगाव:
कोरोना साथरोगात महाराष्ट्रासह देशभरात बस सेवा पूर्णतः बंद होती आता मात्र बहुतांशी शहरासह खेडे गावातील एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात आलेले आहेत परंतु आपण अहमदनगर ते गुंडेगाव जाण्यासाठी व येण्यासाठी बस सेवा अजून सुरू केली नसल्यामुळे गुंडेगाव, देऊळगाव,वाळकी,बाबुर्डी, येथील चाकरमानी व विद्यार्थी, विद्यार्थिनी,ग्रामस्थ, महिलांना अनेक समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे कामावर आणि घरी कसे जायचे हा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे, पर्यायाने त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
परंतु खासगी वाहनांनी प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, ही वस्तुस्थिती आहे. सबब अहमदनगर येथून गुंडेगाव ला येण्या-जाण्यासाठी एसटी बस फेऱ्या सुरू करून द्याव्यात ही जाहीर मागणीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी अहमदनगर,तसेच मा.विभागीय वाहतूक अधिकारी श्री महाजन साहेब,वाहतूक पर्यवेक्षक नितीन गटने यांना देताना गुंडेगावचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे, गुंडेगावचे उपसरपंच मंगेश बापू हराळ,नानासाहेब हराळ,माऊली कुताळ, भवानीप्रसाद चुंबळकर, भाऊसाहेब शिंदे,रोहीदास भापकर, प्रमोद पवार, दादा जावळे,तसेच सदर रोडवरील गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी, यांनी केली आहे अन्यथा आम्हाला नाईलाजाने आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे.