‘दिवाळी भेट’ या कार्यक्रमात वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना किराणा किटचे वाटप  

नगरसेवक धनंजय जाधव यांच्या हस्ते किटचे वाटप

अहमदनगर :
 
 
दैनंदिन जीवनातील गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणारे वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी कोरोना आणी कोरोनामुळे झालेल्या  लॉकडाऊन काळात देखील आपले कर्तव्य पार पाडत होते,  लॉकडाऊन काळात कार्यरत असतांना जन सामान्यांसाठी  देखील खऱ्या अर्थाने एक कोरोना योद्धाची भूमिका त्यांनी पार पाडली  आहे.
त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने घेण्यात येणारे उपक्रम हे कौतुकास्पद असुन भविष्यात साई द्वारका सेवा ट्रस्ट हि संस्था देखील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं असल्याची प्रतिक्रिया श्री साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिली आहे.
श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट आणी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना दिवाळी भेट म्हणून किराणा किटचे वाटप माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे पदाधिकारी व वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
वास्तविक पाहता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांच्या पगारामध्ये कपात झाली. मात्र अश्या काळात देखील
वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी घराबाहेर पडून कोरोनाची प्रत्येक बातमी व कोरोनापासुन कश्या पद्धतीने सतर्क रहावे याची वेळोवेळी माहिती समाजापुढे मांडत होते.
   दरम्यान कोरोनाच्या या कडक लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांसह वृत्तवाहिनीत काम करणाऱ्यांना देखील बसला असल्याने आपल्या सहकाऱ्यांना एक छोटीशी मदत म्हणून माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट आणी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकाला दिवाळी भेट म्हणून किराणा किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता व येणाऱ्या काळात देखील वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया एक ना अनेक उपक्रम राबविणार असल्याची माहीती इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट आणी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी भेट’ या आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांचा सत्कार मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद यांनी तर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर दूस्सल यांनी केलें असुन आभार सुशील थोरात यांनी मानले,
यावेळी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद, उपाध्यक्ष कुणाल जायकर, सचिव लैलेश बारगजे, सहसचिव रोहित वाळके, खजिनदार निखिल चौकर, सागर दूस्सल, सुशील थोरात, संजयकुमार पाठक व सदस्य उपस्थित होते…..!