ST Bus Breaking News! दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकांवर थेट बडतर्फीची कारवाई!

तुम्हीही लालपरीने (ST बस) प्रवास करता का?

🚍
🔥 ST Bus Breaking News! 🔥🚍
दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकांवर थेट बडतर्फीची कारवाई!

 

तुम्हीही लालपरीने (ST बस) प्रवास करता का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे! 🙌 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी लाखो प्रवाशांना रोज गंतव्यस्थानी पोहचवते. राज्यभरच नाही तर गुजरात, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्येही एसटी सेवा उपलब्ध आहे. महिलांना तिकीटात 50% सूट, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास 🚍, विद्यार्थी, पत्रकार, अपंगांना सवलती अशा अनेक सुविधा शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

पण… काही वेळा चालक स्वतःच्या जबाबदारीचा विसर पडून दारूच्या नशेत बस चालवतात! 🍺 अशावेळी प्रवाशांच्या जीवाला प्रचंड धोका निर्माण होतो. मग प्रश्न पडतो – अशा चालकांवर नेमकी कोणती कारवाई केली जाते? 🤔

👉 ST महामंडळाचं उत्तर एकदम कडक!
चालक दारू प्यायलेला आढळला की सुरुवातीला त्याला निलंबित केलं जातं. चौकशीदरम्यान तो दोषी आढळल्यास त्याला नोकरीवरून थेट बडतर्फ केलं जातं. म्हणजेच लालपरीसोबत गाफीलपणा नाही – नाहीच! 🚫

खाजगी वाहन चालकांवर दंड 💸, परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाते. पण ST बसचालक दारू प्यायलेला पकडला तर त्याच्यावर थेट नोकरी गमावण्याची वेळ येते. कारण प्रवाशांच्या जीवाशी खेळणं ST महामंडळाला अजिबात मान्य नाही.

🛑 चालक दारू प्यायला आहे की नाही हे तपासण्यासाठी अल्कोहोल डिटेक्टर आणि ब्रेथलायझर वापरले जातात. सांगली जिल्ह्यातील आकडेवारी पाहिली तर मागील 3 वर्षांत 5 बसचालकांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलं आहे. सध्या आणखी एका चालकाची चौकशी सुरू आहे.

✋ प्रवाशांना जर चालकावर संशय आला की तो नशेत आहे, तर तात्काळ तक्रार दाखल करण्याचं आवाहन ST प्रशासनानं केलं आहे. तक्रार आगार व्यवस्थापक किंवा कंट्रोलर यांच्याकडे नोंदवता येते.

✅ प्रवास सुरक्षित व्हावा म्हणूनच अशा कठोर कारवाया होत आहेत. लालपरी ही केवळ गाडी नाही, तर लाखो प्रवाशांच्या विश्वासाची शिदोरी आहे. त्यामुळे अशा नियमांचं पालन होणं गरजेचं आहे!


🚨 Metro News Alert: प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी ST महामंडळ अगदीच कडक धोरण अवलंबत आहे. चालक दारू पिऊन बस चालवताना पकडला = थेट OUT! 🚫