चंद्र दर्शन झाले नसल्याने गुरुवारी ईद होणार नाही शुक्रवारी होणार रमजान ईद साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात बुधवारी संध्याकाळी चंद्र दर्शन होऊ न शकल्याने गुरुवारी रमजान ईद साजरी होणार नसून, शुक्रवारी ईद होणार असल्याची माहिती हिलाल कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. बुधवारी चंद्र दर्शन होण्याची अपेक्षा होती. त्याप्रमाणे हिलाल कमिटीचे सदस्य सर्जेपूरा येथील तांबोली मस्जिद मर्कजमध्ये चंद्र दर्शनसाठी उपस्थित होते. संध्याकाळी उशीरा पर्यंत चंद्र दर्शन होऊ शकले नाही. भारतात इतर राज्यात देखील चंद्र दर्शन झालेले नाही. यामुळे गुरुवारी ईद साजरी होणार नाही. यावर्षी रमजानचे 30 उपवास होणार आहे. तर गुरुवारी चंद्रदर्शन होऊन शुक्रवारी ईद साजरी होण्याची अपेक्षा असल्याचे हिलाल कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे. सर्व मुस्लिम समाज बांधवांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच ईदचे नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी हिलाल कमिटीचे अब्दुस सलाम, मन्सूर शेख, हुसेनभाई जनसेवावाले, इरफानभाई दूधवाले, बाराबाबळी मदरसेचे मौलाना तारीख कादिर, मोबीन मुल्ला, हाफिज अब्रार, नगरसेवक आसिफ सुलतान, हाजी मिर्झा, जावेद तांबटकर, डॉ. ईकराम काटेवाला, मुक्ती सलीम, अर्शद शेख, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, मौलाना रियाज आदी उपस्थित होते.