लोकसभा निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये 93,50,097/- रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची कारवाई.

मा. निवडणुक आयोग तसेच मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमाला 50,000/- रुपये पेक्षा जास्त अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही. 50,000/- रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळुन आल्यास मा. जिल्हाधिकारी साहेब व निवडणुक आयोग यांना सुचित करावे लागते याबाबत आदेश आहेत.
दिनांक 12/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे रमेशसिंह हेरसिंह राजपुत रा. राजस्थान हा कोणतेही अधिकृत बिले नसतांना त्याचे कब्जामध्ये सोन्याची विविध दागिने बाळगुन ते विक्री करण्याकरीता त्याचे एका साथीदारासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये आला असुन ते सध्या तुलसी विहार लॉजिंग, माणिकचौक, अहमदनगर येथे थांबलेले असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीची हकीगत पोनि श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना कळविली असता त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, मनोहर शेजवळ, रविंद्र कर्डीले, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, संतोष खैरे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वरील पोलीस पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तुलसी विहार लॉजिंग, माणिकचौक, अहमदनगर येथे जावुन खात्री करता सदर लॉजमध्ये इसम नामे 1) रमेशसिंह हेरसिंह राजपुत वय 47 वर्षे, रा. बायोसा गल्ली, बेडा, बेरा, पाली, राजस्थान, 2) नारायणलाल हेमराज गाडरी वय – 27 वर्षे, रा. गाडरी मोहल्ला, धना की, भागल, ताना, चित्तौडगढ, आकोला, राजस्थान असे सोन्याचे विविध दागदागिने व रोख रकमेसह मिळुन आले.
इसम नामे रमेशसिंह हेरसिंह राजपुत याचे कब्जामध्ये 91,78,897/- रुपये किमतीचे 1311.28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने तसेच 34700/- रुपये रोख रक्कम, व इसम नामे नारायणलाल हेमराज गाडरी याचे कब्जामध्ये 1,36,500/- रुपये किमतीचे 19.500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे दोन्ही इसमांकडे मिळुन 93,15,397/- रुपये किमतीचे 1330.78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 34,700/- रुपये रोख रक्कम असा एकुण 93,50,097/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. दोन्ही इसमांकडे त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या दागिण्यांचे अधिकृत बिलाबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचेकडे कोणतेही अधिकृत बिले सोबत नसल्याचे सांगितल्याने सदरचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या सोन्याचे दागदागिने व रोख रकमेबाबत मा. जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी अहमदनगर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर व उपायुक्त आयकर विभाग अहमदनगर यांना पुढील कार्यवाही होणेबाबत विनंती केलेली आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.