ट्रस्टच्या जागेवर ‘गुंडांची ताबामारी!’
📢 दावते इस्लामी हिंद ट्रस्टचा संतप्त आरोप – "कंपाउंड फोडून प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न!"
ट्रस्टच्या जागेवर ‘गुंडांची ताबामारी!’
दावते इस्लामी हिंद ट्रस्टचा संतप्त आरोप – “कंपाउंड फोडून प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न!”
मोक्का अंतर्गत कडक कारवाईची मागणी पोलीस अधीक्षकांकडे
अहिल्यानगर | मेट्रो न्यूज
शहराजवळील पोखर्डी येथील मौजे गट नंबर 164 शेजारी असलेल्या दावते इस्लामी हिंद ट्रस्टच्या मालकीच्या चार गुंठ्यांच्या जागेवर काही समाजकंटकांनी अवैधरित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीने जागेचे तार कंपाउंड तोडून, चारी मारण्याचे काम सुरू केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
धार्मिक कार्यक्रमांसाठी घेतलेली ट्रस्टची मालमत्ता!
ही जागा 26 ऑक्टोबर 2018 रोजी ट्रस्टने अधिकृत खरेदीखताद्वारे घेतली असून, धार्मिक कार्यक्रमासाठी अधिकृत परवानगीसह उपयोगात आणण्याचे नियोजन होते.
“ताबामार टोळीची वाढती दादागिरी सहन होणार नाही!”
दावते इस्लामी हिंद ट्रस्टचे सदस्य अब्दुल सत्तार इस्माईल शेख व इतर विश्वस्तांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत मोक्का अंतर्गत गुन्हेगारी कारवाईची जोरदार मागणी केली आहे.
गोरगरीबांवर अन्याय करणाऱ्या टोळीवर लगाम घालावा – नागरिकांचीही मागणी!
शहरात अशा प्रकारची ताबामारीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या मालमत्तेवर बळजबरीने कब्जा करणारी टोळी उघडपणे वावरत आहे. त्यामुळे त्वरित कडक कारवाई झाली नाही, तर ही ताबा टोळी आणखी आक्रमक होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
#IllegalLandGrab #PlotEncroachment #DaawatEIslami #TrustLandUnderThreat #MokkoActionDemanded #MetroNewsUpdate
