शेतकरी कोमात, सरकार जोमात!
संसदेबाहेर कांद्याच्या माळा घालून महाराष्ट्रातील खासदारांचा सरकारविरोधी हल्लाबोल!
शेतकरी कोमात, सरकार जोमात!
संसदेबाहेर कांद्याच्या माळा घालून महाराष्ट्रातील खासदारांचा सरकारविरोधी हल्लाबोल!
कांद्याच्या दराचा थेट कोसळता ग्राफ
आणि शेतकऱ्यांचे उध्वस्त होत चाललेले संसार… याच मुद्द्यावरून मंगळवारी संसद भवनाच्या मकर द्वारासमोर महाराष्ट्रातील खासदारांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले.
आंदोलनाचा हायलाइट मोमेंट
खासदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून थेट सरकारला टोला – “शेतकरी कोमात, सरकार जोमात!”
आंदोलनाचं नेतृत्व खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. नीलेश लंके, खा. भास्कर भगरे, राजाभाउ वाजे, बजरंग सोनवणे आणि इतर खासदार उपस्थित.
खा. नीलेश लंके यांचा हल्लाबोल
“आज बाजारात कांद्याचा भाव फक्त ₹10-₹12/kg आहे, आणि उत्पादन खर्च ₹14-₹15/kg. म्हणजे शेतकऱ्याला दर किलो मागे थेट तोटा!
”
कांदा – महाराष्ट्राचं नगदी पीक, पण योग्य भाव नाही, कष्ट वाया!
शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर – “ही व्यवस्था बदलावी लागेल!”
निर्यातबंदीवर थेट फटकारा
- मागील 10-11 वर्षांत कांदा निर्यातबंदी 20 पेक्षा अधिक वेळा!
- यामुळे भारतीय कांद्याची जागतिक बाजारातील विश्वासार्हता कमी
![🛑]()
- निर्यातदार अडचणीत, नुकसानाची थेट झळ शेतकऱ्यांना!
फक्त कांदाच नव्हे… दूधही संकटात!
खा. लंके : “दूधाचे दरही कोसळले, शेतकऱ्याला कोणत्याही पिकाला सन्मानजनक भाव नाही. हे आंदोलन फक्त कांद्यापुरतं नाही – ही संपूर्ण शेतीव्यवस्थेची लढाई आहे!”
शेवटचा सवाल
“शेतकरी हा देशाचा अन्नदाता. जर त्यालाच माल विकून तोट्यात जावं लागत असेल, तर हा देश कोणासाठी चालवला जातो?
आज सरकार जोमात, शेतकरी कोमात – हे चित्र बदलणं गरजेचं!”
#KandaAndolan #FarmersProtest #OnionPriceCrash #NileshLanke #SupiryaSule #MetroNewsViral

शेतकऱ्याचा आवाज – आता सोशल मीडियावर दणाणूया!
शेतकरी कोमात, सरकार जोमात!
आंदोलनाचा हायलाइट मोमेंट
खा. नीलेश लंके यांचा हल्लाबोल
”
निर्यातबंदीवर थेट फटकारा
फक्त कांदाच नव्हे… दूधही संकटात!
शेवटचा सवाल