कॅरियर मायडीया व स्नेहालय संस्था यांच्या तर्फे ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन

शिबीर इसळक–निंबळक येथील जी.के.एन. प्रकल्पात युवा आयोजित करण्यात आले

अहमदनगर, दि. २५ जानेवारी २०२१ : कॅरियर मायडीया व स्नेहालय संस्था यांच्या तर्फे ग्रामीण जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात आले. या अंतर्गत पहिले शिबीर इसळक–निंबळक येथील जी.के.एन. प्रकल्पात युवा प्रेरणा शिबिरात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी आयोजित करण्यात आले. स्नेहालयचे संचालक अनिल गावडे या उपक्रमाचे समन्वयक आहेत.  वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. महेश  कांबळे, डॉ. घनश्याम वाळके, डॉ. सुरज पवार, डॉ. वांढेकर आदी वैद्यकीय व्यावसायिक शिबिरार्थीना आरोग्य सेवा देत आहेत. मार्च अखेर पर्यंत जिल्ह्यातील ३० गावांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्याचा स्नेहालय संस्था व कॅरियर मायडीया यांचा मानस असल्याचे कंपनीचे सी.एम.आय. एच. आर. विद्यानंद यादव यांनी सांगितले.

Also see this and subscribe 

स्नेहालय संचालित केरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे. शिबिरांचे  संस्थेच्या सुसज्ज अश्या ‘फिरत्या दवाखान्यात’ शारीरिक तपासणी, योग्य औषधोपचार, रक्त-लघवी तपासणी, इत्यादी सुविधा मोफत पुरविल्या जातात. आतापर्यंत ८ शिबिरांचे यशस्वी आयोजन कॅरियर मायडीया व स्नेहालय संस्था यांनी इसळक–निंबळक, जातेगाव, वाघुंडे बुद्रुक, मुंगशी, वाघुंडे खुर्द, बाबुर्डी, हंगा आणि पळवे बुद्रुक येथे केले असल्याची माहिती कंपनीचे एचआरविभागाचे जेनेरल मॅनेजर पंकज यादव यांनी दिली. सुमारे १००० च्या वर रुग्णांना या शिबिरांचे लाभ झाला असल्याचे कॅरियर मायडीयाचे एचआरचे सिनियर मॅनेजर गौतम साबळे  यांनी सांगितले. मार्च अखेर पर्यंत ३० गावातील ३००० रुग्णांपर्यंत ही मोफत आरोग्य सेवा पोहीचाविण्याचा स्नेहालय संस्था व कॅरियर मायडीया कंपनीचा मानस असल्याचे संस्थेचे सचिव राजीव गुजर आणि अध्यक्ष संजय गुगळे यांनी सांगितले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.