Historic decision at Shanishinganapur Temple!
देशभरात गाजलेल्या ५०० कोटींच्या घोटाळ्यानंतर, शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि गेम-चेंजर ठरणारा निर्णय घेतला आहे.
#BigUpdate | शनिशिंगणापूर देवस्थानचा ऐतिहासिक निर्णय! ![🚩]()
![🔥]()
देशभरात गाजलेल्या ५०० कोटींच्या घोटाळ्यानंतर, शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि गेम-चेंजर ठरणारा निर्णय घेतला आहे.
आता इथले सर्व पूजारी मानधन तत्त्वावर काम करतील. यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेली दक्षिणा पद्धत थांबणार आहे. ![✋]()
![💸]()
काय आहे निर्णय?
देवस्थान विश्वस्त मंडळाने ठरवलंय की—
-
पूजाऱ्यांना भाविकांकडून थेट दक्षिणा घेण्यास कडक बंदी
![🚫]()
-
पूजाऱ्यांना थेट मानधन मिळणार
![💰]()
-
स्थानिक भाविकांना अभिषेक विनामूल्य
![🙏]()
-
बाहेरील भाविकांना 100 रुपये पावती काढूनच अभिषेकाची परवानगी
![🧾]()
-
विशेष विधी, जसं की होमहवन किंवा मोठा धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी भक्तांना ११ हजार रुपयांची अधिकृत पावती घ्यावी लागेल
![🔥]()
कडक नियमावली
देवस्थान प्रशासनाने पारदर्शकतेसाठी काही महत्वाचे नियम लागू केले आहेत:
-
पूजाऱ्यांना रोख रक्कम स्वीकारण्यास मनाई
![🚫]()
![💵]()
-
पूजारी मोबाईल जवळ ठेवू शकणार नाहीत
![📵]()
-
मौल्यवान वस्तूची पूजा केल्यास ती वस्तू देवस्थानच्या ताब्यातच राहील
![💎]()
-
पूजारी पहाटे ४:३० ते रात्री १०:३० अशा दोन शिफ्टमध्ये धार्मिक विधीसाठी उपलब्ध असतील
![⏰]()
मानधन किती?
देवस्थान प्रशासनाने काही प्रमुख पूजाऱ्यांचे मानधन जाहीर केले आहे:
-
जोशी यांना दरमहा ₹31,000/-
-
श्रीपाद राजहंस, संजय जोशी, गजानन कुलकर्णी यांना दरमहा ₹21,000/-
यामुळे आता पूजाऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळणार असून, भाविकांना थेट दक्षिणा देण्याची वेळ येणार नाही.
उशिरा सुचलेलं शहाणपण!
विश्वस्त मंडळ स्थापन झाल्यापासूनच भाविकांनी आणि स्थानिकांनी अशी मागणी केली होती की— पूजाऱ्यांना मानधन द्यावं आणि दक्षिणा पद्धती बंद करावी. पण आजवर ती मागणी पूर्ण झाली नव्हती. अखेर आता प्रशासनाने “उशिरा का होईना, योग्य तो निर्णय घेतला” असं म्हणावं लागेल. ![👏]()
![✨]()
पारदर्शकतेचा नवा अध्याय
अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बानकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले आणि विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देवस्थान विश्वस्त मंडळाची मुदत डिसेंबर 2025 पर्यंत आहे, तोपर्यंत या नियमावलीनुसार कामकाज होणार आहे. ![📑]()
भाविकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे कारण आता पूजा आणि धार्मिक विधी अधिक पारदर्शक व नियमानुसार होतील. भाविकांना पावती मिळणार असल्याने पैशांचा थेट हिशेब होईल. तर पूजाऱ्यांना निश्चित मानधन मिळाल्याने त्यांचं आर्थिक आयुष्य सुरक्षित होईल. ![💯]()
#MetroNews चं मत असं की हा निर्णय म्हणजे शनिशिंगणापूर देवस्थानात विश्वास आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय आहे!
तुमचं मत काय? हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा! ![👇]()

#BigUpdate | शनिशिंगणापूर देवस्थानचा ऐतिहासिक निर्णय!
देशभरात गाजलेल्या ५०० कोटींच्या घोटाळ्यानंतर, शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि गेम-चेंजर ठरणारा निर्णय घेतला आहे.
आता इथले सर्व पूजारी मानधन तत्त्वावर काम करतील. यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेली दक्षिणा पद्धत थांबणार आहे. 

काय आहे निर्णय?



कडक नियमावली





पारदर्शकतेचा नवा अध्याय

#MetroNews चं मत असं की हा निर्णय म्हणजे शनिशिंगणापूर देवस्थानात विश्वास आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय आहे!
तुमचं मत काय? हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा! 
