इतिहास घडला! ‘रीवा-पुणे एक्स्प्रेस’ पहिल्यांदाच थांबली अहिल्यानगरला! लोकांनी केलं जल्लोषात स्वागत

 गुलाब फुलं, मिठाई, हिरवा झेंडा... क्षण झाला अविस्मरणीय!

🚆
 इतिहास घडला! ‘रीवा-पुणे एक्स्प्रेस’ पहिल्यांदाच थांबली अहिल्यानगरला! लोकांनी केलं जल्लोषात स्वागत

🌹 गुलाब फुलं, मिठाई, हिरवा झेंडा… क्षण झाला अविस्मरणीय!

अहिल्यानगर | मेट्रो न्यूज अपडेट – नगरकरांसाठी ऐतिहासिक दिवस! २०१५२ रीवा-पुणे एक्स्प्रेस ट्रेनने पहिल्यांदाच अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर थांबा घेतला, आणि याचे स्वागत झाले मोठ्या उत्साहात!


💐 झाले हार्दिक स्वागत – रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती

ट्रेन स्थानकावर थांबताच झेडआरयूसीसी सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या वतीने रेल्वे प्रशासनाचं स्वागत करण्यात आलं.
रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देवेंद्र कुमार (वरिष्ठ मंडल अभियंता)कपिल शर्मा (सहायक वाणिज्य प्रबंधक)सुधीर महाजन (स्थानक व्यवस्थापक)शुभम थोरात (मुख्य वाणिज्य निरीक्षक) आणि अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


👏 लोको पायलट-गार्डला पुष्पगुच्छ, प्रवाशांना गुलाब-मिठाई!

  • ट्रेनच्या लोको पायलट व गार्डचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
  • प्रवाशांना गुलाब फुलं आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त
  • आणि शेवटी, हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी गाडी रवाना

🙏 सुदर्शन डुंगरवाल यांनी मानले आभार

अहिल्यानगर स्थानकावर ही सेवा मिळाल्याबद्दल श्री. सुदर्शन डुंगरवाल यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री वी. सोमन्ना, खासदार रवनीत सिंह बिट्टू, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणा यांचे आभार मानले.


📸 घटनास्थळी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता!

यावेळी योगेश मुथा, सचिन चोपडा, अमित आनेचा यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तपासणी, फोटोज, सेल्फी, लाईव्ह स्टेटस… सगळं काही या ऐतिहासिक क्षणात टिपलं गेलं!


📲 हा क्षण शेअर करा – अहिल्यानगरच्या प्रगतीचा ऐतिहासिक टप्पा!