“मी तलाठी आहे!” म्हणत वृद्ध महिलेची फसवणूक – सोन्याचे दागिने लंपास 

 ब्रिजजवळ फसवणूक!

🔴
 “मी तलाठी आहे!” म्हणत वृद्ध महिलेची फसवणूक – सोन्याचे दागिने लंपास 😡

अहिल्यानगर 🏙️ – “तुमचं संजय गांधी निराधार योजनेचं बंद झालेलं खातं मी पुन्हा सुरू करून देतो” असं सांगून एका अनोळखी इसमाने वृद्ध महिलेला गंडवून तिचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले! ही धक्कादायक घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील डॉ. जोशी हॉस्पिटलच्या जवळ घडली आहे. 😠👵💰

🌐 नेमकं काय घडलं?

आशाबाई बापू काळे (वय ५५, रा. खडकी, ता. नगर) या त्यांच्या चुलती सरस्वती कोठुळे यांच्यासोबत जोशी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या होत्या. डॉक्टरांनी “तुमचा नंबर १ वाजेपर्यंत येईल” असे सांगितल्याने त्या बाहेर बसल्या होत्या. ⏱️

तेवढ्यात एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला,
🗣️ “मी तलाठी आहे. तुमच्या गावातले बरेच लोक माझ्या ओळखीचे आहेत. तुमचं संजय गांधी योजनेचं खातं बंद झालंय, मी ते सुरू करून देतो… चला माझ्यासोबत अरणगावच्या बँकेत.”

महिलेला विश्वास बसला आणि त्या त्याच्यासोबत मोटारसायकलवर बसून अरणगाव रोडकडे गेल्या. 🚨

📍 ब्रिजजवळ फसवणूक!

रेल्वे ब्रिजजवळ आल्यानंतर त्या इसमाने म्हणालं – “खाते सुरू करायचं असेल तर खर्च लागतो.”
महिलांनी पैसे नसल्याचं सांगितलं, तेव्हा त्याने विश्वासात घेत म्हणालं,
💬 “माझ्याकडे कानातले द्या, काम झाल्यावर परत देतो.”

त्यावर महिलांनी ४ ग्रॅमचा सोन्याचा वेल व ३ ग्रॅमचे घुंगराचे डूल दिले. 😓
पण त्यानंतर तो इसम बँकेत न घेता त्यांना अरणगावात सोडून पसार झाला! 😡🏃‍♂️

👨‍👩‍👧‍👦 नातेवाईकांना कळवल्यानंतर त्यांनी थेट कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. आता या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात BNS कलम ३१९(१), ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गोल्हार करत आहेत. 👮‍♂️📄


⚠️ सावधान!

आजच्या डिजिटल युगात अजूनही असे फसवे लोक समाजात सक्रिय आहेत. सरकारी योजना, पदाधिकाऱ्यांची ओळख, बँक खात्यांचे बहाणे देऊन फसवणूक करणारे अनेकजण फिरत आहेत.

👉 अनोळखी व्यक्तींकडून माहिती घेऊ नका.
👉 दागिने, पैसे किंवा ओळखपत्र कोणीही मागितल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
👉 थोडा सावधपणा तुम्हाला हजारोंचं नुकसान होण्यापासून वाचवू शकतो!

📣 ही माहिती तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहचवा! शेअर करा 🔁, सतर्क रहा 🔍 आणि सुरक्षित रहा 🙏

#FraudAlert #FakeTalathi #SocialScam #SanjayGandhiYojana #AhilyanagarNews #MetroPortal #StaySafe #सावधरा #फसवणूक #BreakingNews 🚨