देशातील सर्वात मोठी सायबर फसवणूक! महिला डॉक्टरकडून तब्बल १९ कोटींचा ‘साईबर लूट’!

 सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला पोलीस, वकील, अधिकारी वगैरे म्हणून दाखवलं.

🚨
 देशातील सर्वात मोठी सायबर फसवणूक! महिला डॉक्टरकडून तब्बल १९ कोटींचा ‘साईबर लूट’! 

📍 गुजरात – गांधीनगर | तारीख : १६ जुलै २०२५


😱 काय घडलंय?

गांधीनगरमधील महिला डॉक्टरच्या नावावर फसवणुकीचा कॉल!
“तुमच्या फोनमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे, मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल होणार!”
असं सांगून 👉 सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला पोलीस, वकील, अधिकारी वगैरे म्हणून दाखवलं.


🕵️‍♀️ ‘डिजिटल अटक’चा नवा ट्रॅप!

🔴 महिला डॉक्टरला सतत धमकीचे कॉल
🔴 घराबाहेर कुठे गेलं तरी “लोकेशन” मागवणं
🔴 तिच्या सगळ्या आयुष्यभराच्या बचतीवर डल्ला!

👉 ३ महिन्यात १९ कोटी रुपये
👉 ३५ वेगवेगळी बँक खाती
👉 सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेऊन पैसे ट्रान्सफर


💔 शेवटी काय?

कॉल्स अचानक बंद
महिलेनं नातेवाईकांना सांगितलं… पण खूप उशीर झालेला!
सीआयडी सायबर सेलने तपास सुरू केला आहे
सुरतहून एकाला अटकही झालीय


⚠️ सतर्क राहा!

 

✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवर गुन्हा सांगत नाही
✅ तुमचे बँक खाते / आधार / OTP कोणालाही देऊ नका
✅ अशा कॉल्स आल्यास लगेच 1930 या हेल्पलाईनवर कॉल करा