“इन्फिनाईट बिकन” आणि “ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट” घोटाळा! गुंतवणूकदारांना पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन!
पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “दर महिन्याला जबरदस्त परतावा मिळेल!” असे सांगून दोन नामांकित कंपन्यांनी शेकडो गुंतवणूकदारांना गंडवले आहे.
या कंपन्या म्हणजे –
Infinite Beacon Financial Services
Tradzz Investment Pvt. Ltd.
या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून पैसे उकळले आणि आता एकाही गुंतवणूकदाराला ना परतावा मिळतोय ना मूळ रक्कम परत! 
काय आहे प्रकरण?
या दोन्ही कंपन्यांनी नागरिकांना आकर्षक स्कीम्स दाखवत दरमहा निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवले. लोकांनी विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक केली. परंतु काही कालावधीनंतर कंपनीने परतावा थांबवला आणि संपर्कही तुटला! 

या गंभीर आर्थिक फसवणुकीबाबत श्रीगोंदा आणि तोफखाना पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. 

पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
ज्यांनी Infinite Beacon किंवा Tradzz Investment मध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी:
आपली कागदपत्रे,
गुंतवणुकीचे पुरावे,
पेमेंटची पावती,
एजंटचे नाव किंवा तपशील
घेऊन तात्काळ आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा! 

डॉ. गोर्डे यांनी स्पष्ट केलं आहे की, गुंतवणूकदारांनी पोलिसांना सहकार्य केल्यास संशयित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करता येईल आणि फसवलेली रक्कम परत मिळवण्याची शक्यता निर्माण होईल. 

युवांनो, अशी फसवणूक टाळायची असेल तर…
‘जास्त परतावा = जास्त धोका’ हे लक्षात ठेवा
कोणतीही स्कीम आकर्षक वाटली तरी ती तपासूनच गुंतवणूक करा
गुंतवणुकीपूर्वी कंपनीची पार्श्वभूमी, नोंदणी, परवाना यांची शहानिशा करा
ही माहिती तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा.
फक्त आपली रक्कम वाचवणं नाही, तर इतरांनाही वाचवणं ही जबाबदारी आपली आहे! 
#InvestmentScam #InfiniteBeaconFraud #TradzzScam #FinancialFraudAlert #AhilyanagarNews #MetroPortal #PoliceAppeal #ScamAlert #StayAware 

