Jalgaon Shock: शाळेतच 13 वर्षांच्या चैतन्यचा अचानक हृदय झटका; मृत्यू!
शाळेच्या मैदानात खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

जळगावच्या मुक्ताईनगरमधील जे. ई. स्कूलमध्ये शिकणाऱ्या चैतन्य शंकर मराठे या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या मैदानात खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटना अशी घडली:
३० जुलै बुधवारी सकाळी शाळेच्या बसने शाळेत आलेल्या चैतन्याने दुपारी जेवणानंतर मित्रांसोबत मैदानात खेळ सुरू केला. थोड्याच वेळात त्याला अचानक त्रास झाला, तो पाणी पिऊन बाकावर बसला आणि काही क्षणी कोसळला. शिक्षकांनी त्वरित रुग्णालयात नेलं, पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही, प्राथमिक अंदाज हृदयविकाराचा झटका असल्याचा आहे. शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत सर्वत्र शोककळा पसरली आहे.
चैतन्यच्या पश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ आहेत. अचानक आलेल्या या धक्क्याने कुटुंब आणि संपूर्ण मुक्ताईनगर परिसर हादरलेला आहे.
या असह्य दुःखात चैतन्याच्या कुटुंबीयांसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करायला हवी.