जरांगे पर्टनचा फटका महायुतीला की आघाडीला ?
कर्जत-जामखेड मतदारसंघातून आ.रोहित पवारांचे तिकीट फिक्स तर महायुतीकडून राम शिंदे कि मधुकर राळेभात सामना रंगणार कोण मारणार बाजी ? याकडे महाराष्ट्राचे लक्ष
जामखेड : राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावेळी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार यांची उमेदवारी फिक्स असून समोर महायुतीची उमेदवारी आमदार राम शिंदे कि मधुकर राळेभात या दोघातून एकाला मिळणार हे निश्चित आहे. काही दिवसांत कर्जत जामखेडच्या भाजपा पक्षाच्या उमदेवारीचे चित्र स्पष्ट होणार या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या आमदार रोहित पवार आमदार प्रा राम शिंदे व भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर राळेभा कर्जत जामखेड मध्ये ठाण मांडून असून स्वाभिमानी व संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपले व सरकारचे कामे सांगत आहेत. त्यातच संघर्ष योध्दा मनोज जरांगे उमेदवार देणार असून महायुती व महाविकास आघाडीतील मराठा उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे त्याचा फटका कोणाला बसेल याबाबत वेगवेगळ्या चर्चा घडत आहेत. एकंदर चित्र पाहता कर्जत जामखेडची जनता कोणाला स्वीकारणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे .
आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदारकीचे एकमेव नेते असल्याने पक्षात त्यांची एकाधिकारशाही आहे. ते हुकुमशाहीसारखे वागत असल्याने त्याला कंटाळून अनेक नेत्यांनी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. अलिकडील काही दिवसात राष्ट्रवादीचे वजनदार नेते व जामखेड तालुक्यातील जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी (शरदचंद्र पवार) राष्ट्रवादीला रामराम ठोकुन मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश केला.
कर्जत जामखेड मतदार संघात प्रा. मधुकर राळेभात व आमदार राम शिंदे यांनी जनसंवाद यात्रा काढुन आमदार रोहित पवार यांची पोल खोल केली तर आमदार रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही जनसंवाद यात्रेतून आमदार राम शिंदे व मधुकर राळेभात यांना जसाश तसे उत्तरे देऊन केलेले विकासकामे सांगून पोल खोल केली. ह्या सर्व घडामोडी व आरोप – प्रत्यारोपाच्या तोफांचे चित्र कर्जत – जामखेडच्या जनतेने पाहिले.
आमदार राम शिंदे हे विधान परिषदेतून २०२२ साली सदस्य झाले. त्यांचा कार्यकाल 2028 पर्यंत आहे. मागील दोन वर्षापासून ते मतदारसंघात सक्रीय झालेले आहे. राज्यातील सत्ताबदलाचा फायदा घेत त्यांनी एमआयडीसी कर्जत तालुक्यात आणली. पाच वर्षे रखडलेल्या जामखेड पाणीपुरवठा योजनेला गती दिली. कृष्णा भिमा स्थिरीकरणासाठी चालवलेला प्रयत्न पाहता भाजपाचा उमेदवार मीच असुन आमदार रोहित पवार यांना मीच फाईट देऊ शकतो असे चित्र निर्माण केले आहे.
कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात 25 वर्षापासून भाजप सत्तेत होती. 2019 ला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना 43 हजार मताधिक्याने निवडुन दिले व 25 वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला उध्दवस्त केला. आमदार रोहित पवार निवडून आल्यानंतर त्यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना करून विकासाचा रोडमॅप तयार केला. राज्यातील सत्तेचा फायदा घेत पहिल्या सहा महिन्यात कामाचा धडाका लावला. कर्जत जामखेड शासकीय अधिकारी व कर्मचारी स्थानिक पातळीवर राहीले तर जनतेचे कामी मार्गी लाघू शकतात या हिशोबाने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या व प्रशासकीय इमारती अद्यावत केल्या तसेच मिरजगाव व खर्डा पोलीस स्टेशनची निर्मिती केली, तरुणांना रोजगार मिळावा म्हणून जामखेड नगरपरिषदेसमोर तीन मजली अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्प्यात आहे. जामखेड येथे पाच मजली उपजिल्हारूगणालय, जामखेड कर्जत भव्य बसस्थानक, जामखेड शहरातून जाणाऱ्या विंचारण व नागेश्वर नदीचे सुशोभीकरण करून नागरिकांना सिमेंटचा रस्ता जॉगिंग साठी केला. नागेश्वर नदीच्या तिरावर जामखेड नगरपरिषद कार्यालय, नानानाणी पार्क, अद्ययावत वाचनालय, विद्यार्थ्यांना अभ्यासिकासाठी अद्यावत वाचनालय तयार केले तसेच सतत पाच वर्षे नागरिकासाठी फिरता दवाखाना, डोळे तपासणी व शस्त्रक्रिया तसेच बचतगटाच्या माध्यमातून 7 हजार जणांना कर्जसुविधा, दहा हजार शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप, राज्य राखीव दलाचे जळगाव येथे गेलेले प्रशिक्षण केंद्र परत आणून चालू केले. खर्डा येथील भुईकोट किल्ल्यासमोर भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज उभारून ग्रिनिज बुकमध्ये नोद झाली अशा विविध कामामुळे व सातत्याने जनतेशी संपर्क व प्रत्येक कुटुंबाशी जोडले गेले आहे यामुळे आ. रोहीत पवार यांचे काम बोलते असे नागरीकात चित्र निर्माण झाले आहे. केलेले विकासकामे व थेट जनतेशी असलेला संपर्क पहाता विदमान आ . रोहीत पवार पुन्हा उमेदवार असल्याने आघाडीत बिघाडी नाही.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना 9 हजार 128 चे मताधिक्य मिळाले आहे . 2019 मध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंना 24 हजारांचे मताधिक्य होते यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ रोहीत पवार यांना 43 हजाराचे मताधिक्य मिळाले . हेच मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस टिकवून ठेवू शकले नाही. त्यातच महायुतीचे बलाढय व विधानसभा इच्छुक समजल्या जाणाऱ्या नेत्यांच्या गावात भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले नाही तर काही ठिकाणी तर काठावर आघाडी आहे.
लोकसभा निवडणुकीत मताधिक्य पाहता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 1995 ते 2014 पर्यंत असलेला भाजपचा बालेकिल्ला परत राखण्यासाठी महायुती जोरदार आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागली आहे तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असुन महायुतीत आमदार राम शिंदे कि मधुकर आबा राळेभात यांच्यापैकी एक उमेदवारीचा प्रश्न निकालात काढावे लागेल . यंदा मात्र चुरशीची लढत होणार असुन कर्जत जामखेडची जनता कोणाला स्वीकारणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे .त्यामध्ये जरांगे पाटील पॅर्टन राबवला तर मात्र डोके दुःखी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे .
चौकट
मराठा चेहरा म्हणुन भाजपकडून राळेभात यांना सुवर्ण संधी
जामखेमध्ये मोठे वलय असलेले प्रा . मधुकर राळेभात यांनी या मतदारसंघात २००९ साली अपक्ष उमेदवारी करून २९ हजार मते मिळवली होती . सध्या आमदार प्रा राम शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे एक मातब्बर मराठा चेहरा म्हणून भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जावू शकते . भाजप पक्षाकडून प्रा . राळेभात हे सक्षम मराठा उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा जामखेड – कर्जतमध्ये चर्चा जोरात सुरू आहे .
चौकट
जरांगे पॅटर्न ठरणार डोके दुःखी
अहिल्यानगर लोक सभा निवडणुकीत जरांगे पाटील फॉर्मुला चांगलाच प्रभावीत ठरला होता . कर्जत जामखेड मतदारसंघ मराठवाड्याला लागुन असल्याने जरांगे फॅक्टर व ओबीसी फॅक्टरचा बोलबाल आहे . त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मातब्बर नेते महायुती व महाविकास आघाडीतील महत्वाचे समजले जाणारे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत .
कर्जतचे महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉग्रेसचे ॲड . कैलास शेवाळे व विखे पॅटर्नचे जेष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ व जामखेड नगरपरिषदचे प्रथम नगराध्याक्ष विकास (तात्या ) राळेभात व एका मुस्लीम समाजाच्या उमेदवाराचा समावेश असुन यांनी संघर्ष योध्या जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागितली आसल्याने कर्जत – जामखेड मतदार संघात जरांगे पॅर्टन मुळे चांगलीचं डोके दुःखी वाढणार असल्याची चर्चाला उधान येत आहे .