जातेगाव येथे अफूची शेती

५६ किलो अफूचे झाडे पोलीसांनी केले जप्त

जामखेड – तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली त्यावरून त्यांनी पथकासह छापा टाकला असता १ लाख ७० हजार रुपयांची ५६ किलो वजनाची अफूची झाडे पोलीसांनी जप्त केले व आरोपी विरूद्ध अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम १५ क प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Also see this and subscribe


याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार दि.२५ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमी दाराकडुन माहिती मिळाली की तालुक्यातील जातेगाव येथे आरोपीचे वासुदेव महादेव काळे वय ३९ रा.जातेगाव याने स्वतःचे मालकीचे गट नंबर १०७७ मध्ये अफूची लागवड केली आहे. या माहितीवरून तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक फौजदार विठ्ठल गायकवाड, संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, संदीप राऊत, सचिन पिरगळ, हनुमान आरसुळ यांचे पथक जातेगाव येथे गुरुवरी रात्री आठ वाजता दाखल झाले.

सदर पथकाने आरोपी वासुदेव काळे यांच्या शेतात छापा टाकला असता त्यामध्ये १ लाख ६९ हजार ८१५ रुपये किंमतीची ५६ किलो ग्रॅम वजनाचे अफूचे झाडे आढळून आली. जातेगाव पोलिसांनी त्याचा पंचनामा करून आरोपीला अटक केली. याबाबत जामखेड पोलीसात संजय लाटे यांनी फिर्याद दिली आहे.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.