मनपा कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीसांची संयुक्त दंडात्मक कारवाई
नागरिकांनी कोरोना नियम, अटींचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन.
अहमदनगर (वैष्णवी घोडके)
महापालिका कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीस यांनी दि.८ रोजी संयुक्तपणे मंगलगेट, कोठला, कल्याण रोड, महात्मा फुले मार्ग (बालिकाश्रम रोड), चितळेरोड, कॉटेज कॉर्नर, तपोवन रोड, राज चेंबर परिसरात तसेच औरंगाबाद रोड या भागात दंडात्मक कारवाई केली. कोरोना संकटकाळात नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, नियम पाळावेत व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपा दक्षता पथकाचे अधिकारी शशिकांत नजान, तोफखाना पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. समाधान सोळंकी यांनी केले.
यावेळी मनपा दक्षता पथकाचे अधिकारी शशिकांत नजान, तोफखाना पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. समाधान सोळंकी, दक्षता पथक सहाय्यक नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, राजेश आनंद, अनिल आढाव, राजु जाधव, विष्णू देशमुख, पोलीस हवालदार जपे, केरुळकर, शिरसाट, नरसाळे आदी कारवाईत सहभागी होते.
महापालिका दक्षता पथकाने ७० विनामास्क, १४,०००/- आणि ५ दुकानांनवर २५,०००/- असे एकूण ३९,०००/- रु दंडात्मक कारवाई वसूली केली तर तोफखाना पोलीस यांच्या वतीने १४ पावत्या व ६८००/- रु दंडात्मक कारवाई वसूली करण्यात आली.