पारंपरिक रांगोळीतूनच वास्तववादी कलाकृती निर्माण होतात- प्रमोद कांबळे
नवले हॉल इथे रांगोळ्यांचे प्रदर्शन
Also see this and subscribe
नागरिकांच्या प्रतिसादामुळे एप्रिलमध्येही कार्यशाळा
या कार्यशाळेमुळे विद्यार्थयांची एकाग्रता वाढून, विद्यार्थी एका ठिकाणी बराच वेळ बसून अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतो. हा फायदा या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना झाला. आपल्या अहमदनगर चे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवार नेणारे जेष्ठ शिल्पकार श्री.प्रमोद कांबळे,यांनी पारंपरिक रांगोळीतूनच अशा वास्तववादी कलाकृती निर्माण होतात, असे प्रतिपादन केले. नगरमधील अशा प्रकारच्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन नागरिकांना केले. या प्रसंगी प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री.अजय अपूर्वा यांनी ही या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. या प्रसंगी एकाग्र चित्ताने एखादं काम करणे आजची पिढी विसरत चालली असताना खूप पेशन्स ठेवून विद्यार्थ्यांनी ह्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत या बद्दल त्यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावं प्रदर्शनाला सौ. दीपाली देऊतकर यांनी ही भेट देऊन मुलांचे कौतुक केले. एप्रिल मध्ये पुन्हा अशीच कार्यशाळा घेण्यात येणार असून सुजाता औटी पायमोडे यांनी कलाप्रेमिंना आवाहन केले आहे की त्वरित आपले नाव नोंदवून आपली जगा नक्की करावी. एप्रिल मधील ही कार्यशाळा कलारंग ड्रॉईंग अकॅडमी, सपकाळ हॉस्पिटल समोर, सहकार नगर, सावेडी, अहमदनगर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०१७७०४२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुजाता पायमोडे यांनी केले आहे.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.