फोडणी तडकली कर्जतमध्ये राष्ट्रवादीची लाडकी बहिण भडकली
महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार यावर संतप्त प्रतिक्रिया
महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार यावर संतप्त प्रतिक्रिया
जामखेड – फोडणी तडकली लाडकी बहिण भडकली या टॅग लाईन खाली महागाई, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, पडलेले शेती माल याविषयी कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये महिलांनी महायुतीच्या सरकार विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
महायुती सरकार म्हणजे फक्त भुलभुलैय्या आहे. लाडकी बहिण योजना आणली पंधराशे रूपये महिन्याला देतात पण जीवनावश्यक वस्तू च्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. एक पट देतात पण तिप्पट वसुली सुरू आहे असे महिलांनी बोलताना सांगितले.
महायुती सरकार च्या काळात महिला अत्याचार सुरू आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगार युवकाच्या हाताला काम नाही. उद्योगधंदे महाराष्ट्रतून गुजरात ला चालले आहेत. बेरोजगार युवक निराश आहे. आणि सरकार लाडक्या बहिणीचे गाजर दाखवले जात आहे.
खरी लाडकी बहिण योजना कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी पाच वर्षापूर्वीच सुरू केलेली आहे. मतदारसंघात महिला सक्षमीकरण, भरोसा सेल, बचत गट माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघाचे खरे भाग्य विधाते रोहित पवारच आहेत. त्यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी खुपच काम केले आहे. विरोधक मात्र विकास कामात खोडा घालण्याचे काम करत आहेत. कोरोना काळात हा ढोंगी पुत्र घरात बागेत झाडांना पाणी घालत होता. तर रोहित पवार लोकांची सेवा करत होते लोकांना धीर देत होते.
लाडकी बहिण योजना १८ वर्षांपुढील महिलांनाच आहे १८ च्या आत वय असणाऱ्या लाडक्या बहिणी नाहीत का❓ असा सवाल उपस्थित केला.
आमदार प्रा. राम शिंदे रोहित पवार यांना पाच वर्षांच्या कामाचा हिशोब मागतात मात्र शिंदे यांनी
तुम्ही दहा वर्षांत काय केले हा हिशोब द्यावा
दुष्काळात आपले पालकमंत्री भुमीपुत्र म्हणतो गुरे पाहुण्यांकडे न्या, पोलीस स्टेशन साठी क्राइमरेट वाढवा म्हणतात, दुष्काळात टँकर बंद केले हा कसला भुमीपुत्र जो जनतेची सेवा करतो तोच खरा भुमीपुत्र आहे. आणि आपला विकास पुत्र रोहित पवार हेच खरे भुमीपुत्र आहेत.
यावेळी प्रा. कविता म्हेत्रे, राजश्री मोरे, सविता गोलेकर, राणी कानगुडे, पुजाताई सुर्यवंशी, मिनाक्षी साळुंखे, प्रिती जेवरे, मनिषा सोनमाळी, उषा राऊत, प्रतिभा भैलुमे, ताराबाई कुलथे, शकुंतला निगुडे, संगिता तोरडमल, लता खरात, ज्योती शेळके, हर्षदा काळदाते, पुजा म्हेत्रे, स्वाती पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांनी महायुती सरकार वर ताशेरे ओढले व विकास पुरुष रोहित पवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )