खर्डा ग्रामपंचायतीचा मान उंचावला! सरपंच संजीवनी पाटील यांना लाल किल्ल्यावर झेंडावंदनासाठी खास निमंत्रण
खर्डा गावासाठी अभिमानाचा क्षण! ग्रामपंचायत सरपंच संजीवनी पाटील आणि त्यांचे पती, जामखेड बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ऐतिहासिक स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे.
खर्डा ग्रामपंचायतीचा मान उंचावला! सरपंच संजीवनी पाटील यांना लाल किल्ल्यावर झेंडावंदनासाठी खास निमंत्रण ![🎉]()
जामखेड | मेट्रो न्यूज
खर्डा गावासाठी अभिमानाचा क्षण! ग्रामपंचायत सरपंच संजीवनी पाटील आणि त्यांचे पती, जामखेड बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ऐतिहासिक स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे.
महाराष्ट्रातून फक्त १५ सरपंच!
पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे गुणवत्ता आणि विकासकामांच्या निकषांवर आधारित सरपंचांची नावे सुचवली होती. महाराष्ट्रातील फक्त १५ सरपंचांची निवड झाली असून, खर्डा ग्रामपंचायतीच्या संजीवनी पाटील यांचे नाव त्यात झळकले आहे.
विकासकामांमुळे मिळाला सन्मान
खर्डा ग्रामपंचायतने हर घर जल योजना, ग्रामस्वच्छता अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मातृ वंदना योजना, मिशन इंद्रधनुष, सक्षम अंगणवाडी, सूर्य घर योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हाच त्यांच्या निवडीचा पाया ठरला.
गावात जल्लोष, नेत्यांकडून अभिनंदन
या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन गायवळ, भगवान मुरूमकर, भाजपचे जिल्हा-तालुका पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी संजीवनी पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
गावकऱ्यांच्या मते –
“१५ ऑगस्टला खर्ड्याचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकणार, हा आमच्या गावासाठी ऐतिहासिक क्षण आहे!”

महाराष्ट्रातून फक्त १५ सरपंच!
विकासकामांमुळे मिळाला सन्मान
गावात जल्लोष, नेत्यांकडून अभिनंदन