“फेक नोटांचा बादशाह!”

बनावट ५०० च्या नोटांचा मास्टरप्लॅन उघड! पोलिसांच्या ‘ऑपरेशन फेक करन्सी’ची मोठी कामगिरी!

💣
 “फेक नोटांचा बादशाह!”

बनावट ५०० च्या नोटांचा मास्टरप्लॅन उघड! पोलिसांच्या ‘ऑपरेशन फेक करन्सी’ची मोठी कामगिरी!

📍 अहिल्यानगर: बनावट नोटांचं महाजाळ अखेर पोलिसांनी फोडलं! छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात तब्बल ६० लाखांच्या बनावट नोटा आणि २ कोटींपेक्षा अधिक कच्चा माल पोलिसांनी पकडला आहे.

👮 ‘ऑपरेशन फेक करन्सी’मध्ये सात जणांना अटक झाली असून, या रॅकेटचा मेंदू – अंबादास ससाणे (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव) सध्या फरार आहे. पोलिसांचा दावा आहे की, २०१५ पासून ससाणे हेच ‘फेक नोटांचे किंगपिन’ आहेत!


🧠 मास्टरप्लॅनचं कोडं!

👉 मशीन मागवलं भोपाळहून,
👉 कागद मागवला मुंबईहून,
👉 सिमकार्ड घेतलं बनसोडेच्या नावावर,
👉 नोटांवर सुरक्षेच्या हू-ब-हू नक्कल!

या बनावट नोटा इतक्या हुबेहुब होत्या की खऱ्यापासून वेगळ्या ओळखणं अवघड! किरकोळ व्यवहार, चहाच्या टपऱ्या, किराणा दुकाने यांमध्ये या नोटा फिरवल्या जात होत्या.


😱 एक दुकानदार झाला ‘गुप्तहेर’!

अहिल्यानगरजवळील आंबिलवाडीतील एका छोट्या दुकानदाराने सावधगिरी बाळगली आणि पोलिसांना माहिती दिली. हीच माहिती पुढे ‘फुल्ल टू’ क्राइम एक्सपोज ठरली!


⚠️ सतर्कतेचा सायरन!

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावर जिल्ह्यातील सर्व बँकांना सूचना दिल्या जात आहेत. बनावट नोटा मिळाल्यास तात्काळ माहिती द्या!

🧾 पोलिसांकडून नागरिकांनाही आवाहन – “रोख व्यवहार करताना नोटा पारखून घ्या!”


👇 कायद्याची ‘सत्यनारायण कथा’ नाय… थेट तुरुंगवास!

IPC कलम १७९ व १८० नुसार –
💥 बनावट नोटा वापरणे, साठवणे, विकणे = गंभीर गुन्हा
👉 शिक्षा: १० वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा आजीवन कारावास!


🚨 अजून उलगडायचं बाकी आहे!

‘फेक नोटांचा डॉन’ ससाणे गजाआड झाल्यावरच उरलेले क्राईम नेटवर्क, गुंतवणूकदार, पंटर यांचं संपूर्ण जाळं बाहेर येणार आहे!