तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Dakhla) काढायचं आहे का? मग ही पोस्ट नक्की वाचा
Share
कुणबी दाखला अपडेट! तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Dakhla) काढायचं आहे का? मग ही पोस्ट नक्की वाचा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर झालेलं आंदोलन सगळ्यांच्या लक्षात आहे. या आंदोलनानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला – हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR. यानंतर आता मराठा समाजातील लोकांना कुणबी दाखला मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
पण… फक्त बोलून दाखला मिळत नाही . यासाठी काही डॉक्युमेंट्स/कागदपत्रं लागतात . ही कागदपत्रं नीट पूर्ण केलीत तरच तुम्हाला कुणबी दाखला मिळेल .
कुणबी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड सर्टिफिकेट अर्जदाराचा किंवा त्याच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट द्यावं लागेल. या कागदपत्रावर जन्मतारीख आणि जन्मस्थानाचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे.
ओळखीचा पुरावा (ID Proof) आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र. यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची साक्षांकित प्रत जोडावी लागेल.
पत्त्याचा पुरावा (Address Proof) रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, मिळकत कर पावती, 7/12 उतारा, 8 अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टी. यापैकी कोणतंही एक कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे.
विहित नमुन्यातील अर्ज + कोर्ट फी स्टॅम्प जातीचा दाखला काढण्यासाठी अधिकृत अर्ज नमुना भरावा लागतो. या अर्जावर ₹10 कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट लावून अर्जदाराचा फोटो लावणं आवश्यक आहे.
प्रतिज्ञापत्र (Affidavit) अर्जदाराने स्वतः कुणबी असल्याचा आणि ज्या नातेवाईकाचा कुणबी पुरावा जोडला आहे, त्यासंबंधीची माहिती ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात द्यावी लागते.
किती दिवस लागतात कुणबी दाखला मिळायला?
अर्ज तुम्ही आपले सरकार सेवा (MahaOnline Center) मार्फत करू शकता . वेबसाईट: https://aaplesarkar.mahaonline.gov.in अर्ज केल्यानंतर तो तहसील कार्यालयाकडे जातो. सर्व कागदपत्रं योग्य असल्यास उपविभागीय अधिकारी (SDO) प्रमाणपत्र जारी करतात. यासाठी अंदाजे 21 ते 45 दिवस लागू शकतात .
तरुणाईसाठी महत्वाचा धडा
आरक्षण मिळवण्यासाठी कुणबी दाखला अत्यंत महत्वाचा ठरत आहे. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रं दिल्यास प्रक्रिया अडकू शकते . त्यामुळे आधीच सर्व कागदपत्रं नीट जमवून ठेवा आणि मगच अर्ज करा .
सोशल मीडियावर चर्चा
या विषयावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगतेय . “मराठा समाजासाठी मोठा दिलासा”, “कुणबी दाखला काढण्याची प्रक्रिया सोपी व्हायला हवी”, “21-45 दिवस खूप वेळ आहे” असे अनेक कमेंट्स येत आहेत .
तुमचं मत काय? कुणबी दाखला काढण्याची प्रक्रिया अजून सोपी व्हायला हवी का? ऑनलाईन अर्जानंतर दाखला मिळायला किती दिवस लागले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवा