डंपर चोरी की LIVE रिटर्न! महसूल प्रशासनाचा ‘स्वॅग’ पाहून माफिया घाबरले!
CCTV फुटेजमध्ये विश्वास पटारे आणि दोन अनोळखी व्यक्ती डंपर नेताना कैद!

नेवासे | प्रतिनिधी
“चोरीचा डंपर… आणि २४ तासांत परत ‘जैसे थे’?”
होय! महसूल विभागाच्या कडक कारवाईने वाळू माफियांना चक्क घाम फुटला!
घटना काय होती?
10 जून – मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे यांनी अवैध माती वाहून नेणारा डंपर (MH16 AE 4770) पकडला
तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात ठेवण्यात आला
पण… 5 जुलै रोजी डंपर गायब!
CCTV फुटेजमध्ये विश्वास पटारे आणि दोन अनोळखी व्यक्ती डंपर नेताना कैद!
तहसीलदार संजय बिरादार यांची पोलिसात तक्रार
तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल
प्रशासनाची तातडीची कारवाई
आणि… अवघ्या २४ तासांत डंपर परत मूळ ठिकाणी!
डर का माहौल!
“प्रशासनाची कडक भूमिका पाहून वाळू माफिया हादरले. चक्क डंपर परत आणून उभा केला!”
– परिसरात सध्या हीच चर्चा.
संदेश स्पष्ट आहे – कायद्यापुढे कुणीही मोठा नाही!
तहसीलदारांचा ठाम निर्णय
वाळू तस्करांची धडधड