Local Body Elections 2025 : बुलढाण्यात काँग्रेस विरुद्ध भाजपची थेट टक्कर!
बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा भन्नाट रंगणार आहेत!
Share
Local Body Elections 2025 : बुलढाण्यात काँग्रेस विरुद्ध भाजपची थेट टक्कर!
बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा भन्नाट रंगणार आहेत! परंपरेने काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या बुलढाण्यात आता भाजपची ताकद वेगाने वाढते आहे. यामध्ये फोडाफोडी, नाराजी आणि गोटबाजी हे घटक निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतील, हे स्पष्ट झाले आहे.
भाजपचा ५१% मिशन
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले – “भाजप उमेदवाराला किमान ५१% मते मिळवून द्यायचीच!”
हा पॅटर्न आता बुलढाण्यात राबविण्याचे संकेत आहेत.
भाजपने उमेदवार निवडीत सरळ फॉर्म्युला लावला आहे – जिंकण्याची शक्यता ज्यांची जास्त, त्यांनाच तिकीट!
म्हणूनच ग्रामीण व शहरी भागात मोठमोठे कार्यकर्ता संवाद मेळावे आणि बैठका घेतल्या जात आहेत.
२०१७ ची निवडणूक आकडेवारी पालिका (३०१ जागा) : काँग्रेस – १०३ | भाजप – ७५ जिल्हा परिषद (६० जागा) : काँग्रेस – १४ | भाजप – २४ पंचायत समिती (१२० जागा) : काँग्रेस – २८ | भाजप – ३९ एकूण (४८१ जागा) : काँग्रेस – १४८ | भाजप – १३८
यावरून स्पष्ट होते की भाजपने २०१७ मध्ये काँग्रेसच्या गडाला मोठा तडा दिला होता. आता काँग्रेससमोर स्वतःची ताकद वाचवण्याचे मोठे आव्हान आहे.
महाविकास आघाडीचा प्लॅन
काँग्रेससोबत उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चर्चा करत आहेत. काँग्रेसमध्ये काही गळती झाली असली तरी दुसऱ्या फळीतील नेते पुढे येत आहेत. आघाडी म्हणून काँग्रेसने मोट बांधली नाही, तर भाजप मागील तडा मोठ्या भगदाडात बदलू शकतो!
भाजपचा ग्रामीण फोकस
२०१७ मध्ये भाजपने शहरी भागात आपली ताकद दाखवली, पण ग्रामीण भागात तुलनेने कमी कामगिरी केली होती. यंदा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी खास रणनीती आखली आहे. लोणार, मेहकर, सिंदखेड राजा व ९ तालुक्यांमध्ये बैठका घेऊन संघटना मजबूत करण्यावर भर.
आव्हाने आणि आरोप भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेस-आघाडी करत आहे. यामुळे भाजपला काही फायदा होऊ शकतो, पण स्वपक्षीय नाराजीही ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदेसेना आणि अजित पवार गटातील नेत्यांचा समतोल राखणं हेही भाजपसमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे.
मोठा सवाल : बुलढाण्यात काँग्रेस आपला परंपरागत गड वाचवू शकेल का? की भाजपचा ‘५१% मिशन’ काँग्रेसला नामोहरम करणार? फोडाफोडी व नाराजीवर कोणती बाजू नियंत्रण मिळवणार?
मेट्रो न्यूजचे विश्लेषण – बुलढाण्याची निवडणूक ही फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित नसून, राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का किंवा बळ देणारी ठरू शकते.
काँग्रेस की भाजप? निर्णय मतदारांच्या हातात!