लग्नाचं आमिष, बलात्कार, आणि २० दिवसांचा थरार – शेवगाव पोलिसांची ‘सिनेस्टाईल’ अॅक्शन!
धुळे जिल्ह्यातून आरोपीला पकडलं, मध्य प्रदेशकडे पळण्याचा प्रयत्न फसला!

धुळे जिल्ह्यातून आरोपीला पकडलं, मध्य प्रदेशकडे पळण्याचा प्रयत्न फसला!
जिल्हा अहमदनगर | पोलीस न्यूज नेटवर्क
लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार करणारा आरोपी शेवगाव पोलिसांच्या तावडीत!
२० दिवसांपासून फरार असलेल्या अण्णासाहेब उर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधळे या आरोपीला शेवगाव पोलिसांनी अखेर धुळे जिल्ह्यातून ‘सिनेस्टाईल’ पाठलाग करून अटक केली.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं.
गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी २७ जुलैला आरोपीला ट्रकमधून फरार होण्याआधीच ‘धुळ्यातून धरा’ टाकली.
काय घडलं होतं नेमकं?
२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आरोपींनी एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून गाडीमध्ये बसवलं आणि “आरडाओरडा केलास तर अॅसिड टाकू!” अशी धमकी दिली.
तिला थेट पुणे जिल्ह्यातील आळंदीला नेण्यात आलं, जिथे मुख्य आरोपी अण्णासाहेबने तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेच्या फिर्यादीनुसार ८ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा क्र. ५९७/२०२५
भा.दं.वि. कलम ६४, १२७(२), ८७.३(५) अंतर्गत कारवाई
अटकेनंतर न्यायालयात हजर
आरोपी अण्णासाहेबला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
३० जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कारवाईचा टीमवर्क:
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्ग
उपविभागीय अधिकारी सुनील पाटील
अंमलदार – बाजीराव सानप, रामहरी खेडकर, भगवान सानप, शाम गुंजाळ, संपत खेडकर, ईश्वर बेरड, राजू बढे, सचिन पिरगळ, राहुल गुड्डू (सायबर सेल)
पुढील तपास सुरूच आहे…!
काय शिकावं यामधून?
अफवांवर विश्वास नको
महिलांनी तात्काळ पोलिसांत तक्रार करावी
सोशल मीडियावर फक्त सत्य माहिती शेअर करा