नवीन वर्षाची सुरुवात थंडी सोबतचं होणार!
महाराष्ट्र : राज्यातील वातावरण कोरडे होत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे सोमवारपासून (दि. ३०) थंडीचा कडाका वाढणार आहे. रविवारी (दि. २९) राज्याच्या अनेक शहरांतील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण झाली होती. नाशिकमध्ये नीचांकी तापमान १५.४ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. अफगाणिस्तानकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे लेह, लडाख, काश्मीर भागात हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये किमान तापमान उणे ६ ते ७ अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणामध्ये दाट धुके तयार झाले आहे. त्यामुळे आता ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
४ जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता
३ ते ४ जानेवारी रोजी पुन्हा नवीन पश्चिमी चक्रवाताचा अंदाज असल्याने पुन्हा हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.