निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदानानंतर ४५ दिवसांत सर्व फुटेज नष्ट करण्याचे आदेश!
नवीन नियम काय आहे?

नवी दिल्ली:
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचे फुटेज गैरवापर होऊन चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा संशय केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आयोगाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
नवीन नियम काय आहे?
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४५ दिवसांत सर्व सीसीटीव्ही फुटेज, वेबकास्टिंग रेकॉर्डिंग आणि व्हिडिओग्राफी नष्ट करावी, असे आदेश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मात्र, जर या ४५ दिवसांत कोणी निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान दिले असेल, तर ती सर्व रेकॉर्डिंग नष्ट करता येणार नाहीत.
कशामुळे बदल?
- निवडणूक प्रक्रियेत रेकॉर्डिंग करणे कायद्याने बंधनकारक नाही, हे आयोगाने स्पष्ट केले आहे.
- हे रेकॉर्डिंग फक्त निवडणूक व्यवस्थापन व अंतर्गत कामकाजासाठीच केले जात होते.
- परंतु काही वेळा या फुटेजचा संदर्भ नसतानाही सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली गेली, असे आयोगाचे म्हणणे आहे.
विवाद आणि राजकीय टीका:
चंदीगड उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान संदर्भातील सर्व माहिती आणि दस्तावेज देण्याचे आदेश दिले होते. यानंतर अवघ्या ४८ तासांत आयोगाने नियम बदलला आणि फुटेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पाटोले यांनी आरोप केला आहे की, “आपली चोरी उघड होईल या भीतीने मोदी सरकारच्या मदतीने निवडणूक आयोगाने हा नियम बदलला.”
तुमचा काय विचार आहे? निवडणूक प्रक्रियेतील फुटेज नष्ट करणे योग्य आहे का? की पारदर्शकतेसाठी हे ठेवायला हवे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा!
#ElectionCommission #VotingTransparency #CCTVFootage #SocialMediaMisinformation #IndianPolitics #YouthVoice