अहिल्यानगर MIDC विस्ताराची मोठी मागणी! विनायकराज प्रतिष्ठानकडून उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांना निवेदन
अहिल्यानगर शहर आता उद्योगक्षेत्राच्या नकाशावर मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे!
Share
अहिल्यानगर MIDC विस्ताराची मोठी मागणी! विनायकराज प्रतिष्ठानकडून उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांना निवेदन
अहिल्यानगर शहर आता उद्योगक्षेत्राच्या नकाशावर मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे!
विनायकराज प्रतिष्ठानतर्फे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांना नगर येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी अहिल्यानगर MIDC साठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये प्रतिष्ठानचे विनय वाखुरे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी सांगितले की, सध्याची MIDC वाढत्या औद्योगिक गरजांसाठी अपुरी पडत आहे. IT, Manufacturing आणि Automobile क्षेत्रातील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती जाहीर कराव्यात. उद्योग क्षेत्र वाढल्यास स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे वाहतुकीचा ताण वाढत असल्याने अनेक कंपन्या नवीन जागेच्या शोधात आहेत. अशा वेळी अहिल्यानगर MIDC हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, IT कंपन्यांसाठी लागणाऱ्या इमारती आधीच अहिल्यानगरमध्ये उपलब्ध आहेत. योग्य नियोजन केल्यास या इमारतींचा वापर करून IT Park सुरु करता येईल. नवीन जागा उपलब्ध झाली तर Auto व Manufacturing क्षेत्रातील आधुनिक उद्योग उभारणी शक्य होईल.
प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, सरकारने जर विशेष सवलती दिल्या तर अहिल्यानगर MIDC महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते.
यातून केवळ शहराचा सर्वांगीण विकास होणार नाही, तर स्थानिक उद्योजक आणि तरुणाईला रोजगाराच्या नव्या दालनांचेही दरवाजे खुले होतील.
स्थानिक नागरिकांचाही या मागणीस मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
अहिल्यानगरचे MIDC विस्तारल्यास रोजगार, उद्योग आणि विकास यांचा तिहेरी लाभ होणार हे नक्कीच! तुमचे मत काय? MIDC विस्तारामुळे किती बदल घडतील असं तुम्हाला वाटतं?