गांजाच्या प्रकरणात आरोपी न करता "साक्षीदार" करण्यासाठी तब्बल ₹1.5 लाख लाच मागितली
Share
सोलापूर पोलिसात मोठा घोटाळा!
गांजाच्या प्रकरणात आरोपी न करता “साक्षीदार” करण्यासाठी तब्बल ₹1.5 लाख लाच मागितली
प्रकरण सोलापूरच्या कोतवाली पोलिस ठाण्याशी निगडीत आहे. एका गोपनीय कर्मचाऱ्याने आणि एका खाजगी इसमाने हातमिळवणी करून तक्रारदाराला दबाव टाकला. “गांजा प्रकरणात तुला आरोपी करण्याऐवजी साक्षीदार करायचं असेल तर दीड लाख रुपये लागतील!” असा थेट सौदा करण्यात आला.
पण तक्रारदार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (ACB) कडे गेला. तक्रारीनंतर पडताळणी झाली आणि सापळा रचण्यात आला. त्यानंतर कोतवालीतील गुप्त कर्मचाऱ्यासह एका खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पोलिस व्यवस्थेतच धक्कादायक भ्रष्टाचार समोर आलाय. आरोपी ऐवजी साक्षीदार करण्याची “सेवा” देण्यासाठी पोलिस कर्मचारीच पैसे मागतोय हे ऐकून नागरिकांत संताप व्यक्त होतोय.
नेटिझन्सचे रिअॅक्शन –
“पोलीस गुन्हेगारांशी हातमिळवणी करत असतील तर न्याय कुठे मिळणार?”
“ACB ने वेळेवर कारवाई केली नसती तर कित्येक निरपराध लोक अडकले असते!”
ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. #ACBAction #Solapur #CorruptionExposed #PoliceScam #ViralNews