राज्य गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांकाने झळकला कुमार चि. आरव अभिजीत पाटकुलकर

अ.ए.सो.ची नवीन मराठी शाळा, भिंगार शाळेत

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2024. या परीक्षेमध्ये अ.ए.सो.ची नवीन मराठी शाळा भिंगार अहमदनगर चि. आरव अभिजीत पाटकुलकर या विद्यार्थ्याने राज्य गुणवत्ता यादी पाचवा क्रमांक मिळविला. त्याच्या या यशात त्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ गांगर्डे विद्या व शिक्षक श्री कातोरे शरद व सौ. गायकवाड ज्योती यांनी खूप परिश्रम घेतले.
तसेच संस्थेच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय श्रीमती छायाताई फिरोदिया, सह कार्यवाह श्री. गौरव फिरोदिया, सर्व विश्वस्त मंडळ व शालेय समिती यांनी मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून कौतुक केले.