भारताला दुसरे कांस्यपदक

ता.३० जुलै रोजी पॅरिस ओलंपिक २०२४ च्या चौथ्या दिवशी भारताने दुसरे कांस्यपदक पटकावले आहे.

भारताला दुसरे कांस्यपदक
पॅरिस – ता.३० जुलै रोजी पॅरिस ओलंपिक २०२४ च्या चौथ्या दिवशी भारताने दुसरे कांस्यपदक पटकावले आहे. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने दहा मीटर मिक्स इयर पिस्तूलच्या जोडीने १६-१० च्या फरकाने कांस्यपदक पटकावले आहे. मनु भाकर हीने भारताला सलग दुसरे कांस्यपदक मिळवून दिले आहे. मनू भाकर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित करून खेळत होती. सर्व पिछाडीवर पडल्यास ती शानदार नेम साधत होती. भारतीय संघाने पहिला सेट गमावला, परंतु दुसऱ्या सेटपासून मात्र सतत आघाडी मिळवली. भारतीय संघाच्या ४ शॉट्स नंतर सतत ६-२ फरकाने पुढे राहिला. अतितटीच्या झालेल्या या सामन्यात कोरियाने एक सेट जिंकला होता, परंतु मनु भाकर आणि सरबजोत सिंग या भारतीय जोडीने सातत्यपूर्ण शानदार खेळाने जबरदस्त कामगिरी करत विजयी लक्ष गाठून कांस्यपदक पटकावले आहे. भारताला एकाच ऑलम्पिक मध्ये दोन पदक जिंकून देणारी मनू भाकर ही पहिलीच खेळाडू ठरली आहे.