“मंत्री पत्ते खेळतात… आणि शेतकरी रस्त्यावर!”
नगर-पुणे रोडवर कायनेटिक चौकात प्रहार जनशक्ती व दिव्यांग क्रांती संघटनेचं अनोखं चक्काजाम आंदोलन! शेतकऱ्यांचं कर्जमाफी, सातबारा कोरा, दिव्यांगांचं मानधन वाढ, मजूर, मेंढपाळ, ग्रामकर्मचाऱ्यांचे हक्क अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन चांगलंच पेटलं!

नगर-पुणे रोडवर कायनेटिक चौकात प्रहार जनशक्ती व दिव्यांग क्रांती संघटनेचं अनोखं चक्काजाम आंदोलन!
शेतकऱ्यांचं कर्जमाफी, सातबारा कोरा, दिव्यांगांचं मानधन वाढ, मजूर, मेंढपाळ, ग्रामकर्मचाऱ्यांचे हक्क अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन चांगलंच पेटलं!
पत्ते खेळत सरकारवर निशाणा!
“मंत्र्यांना पत्ते खेळायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला नाही!” म्हणून रस्त्यावर पत्त्याचा डाव आणि जमिनीवर आसूड!
गायी, बैल, म्हशींच्या उपस्थितीत आंदोलनाचा आगळा वेगळा अंदाज!
शेतकरी, दिव्यांग, विधवामाता, मेंढपाळ, कामगार, माजी सैनिक सर्वांनी एकत्र येत दिला सरकारला इशारा!
प्रहार संस्थापक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाची ठिणगी पेटली!
“सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत, तरी सरकार झोपेत आहे का?”
“आता फक्त आश्वासन नाही, निर्णय हवा!”
– जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी
– दिव्यांग क्रांतीचे अध्यक्ष अँड. लक्ष्मण पोकळे