आमदार संग्राम जगताप भरणार आज अर्ज !
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत राजकीय डावपेच टाकण्यासाठी माजी आमदार अरुण जगताप आता मुलासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. ते मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत. त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी वर्गाशी संवाद साधला. जगताप यांनी शहराचा केलेला विकास व झालेला कायापालट याची माहिती दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जगताप म्हणाले की, गेल्या १० वर्षांत आमदार संग्राम जगताप यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले कर्तव्य बजावत केलेल्या विकास कामांमुळे प्रलंबित समस्या सुटल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकायनि व आमदार जगताप यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शहराच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला. त्यातून शहरात मोठी विकासकामे सुरू आहेत. व्यापारी वर्ग, बाजारपेठ्यांचे अनेक प्रलंबित मागण्या व समस्या सोडवल्या आहेत. शहरातील नागरिकांची मूलभूत प्रश्न मार्गी लागल्याने जनमताचा कौल हा जगतापांच्या बाजूने आहे. जनमत बरोबर असल्याने निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही. यावेळी सुभाष पोखरणा, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा, गोपाल मणियार, राजेंद्र चोपडा, अविनाश घुले, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, आदी उपस्थित होते.