शहरासह उपनगरात मोफत नाडी परीक्षण व उपचार शिबिराचे आयोजन
7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर – शहरासह उपनगरात जुनाट आजार व व्याधींवर उपचारासाठी मोफत नाडी परीक्षण करुन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरु प.पु. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ते 14 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान सदर शिबिर होणार आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील नामांकित डॉ.गौरकर व डॉ.पाटील रुग्णांची तपासणी करुन उपचार करणार असून, या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.7 नोव्हेंबर) नवनागापूर, शुक्रवारी (दि.8 नोव्हेंबर) सावेडी गणेश मंदिर, शनिवारी (दि.9 नोव्हेंबर) वृंदावन कॉलनी, रविवारी (दि.10 नोव्हेंबर) तपोवन रोड, सोमवारी (दि.11 नोव्हेंबर) भिंगार, मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) सारसनगर, बुधवारी (दि.13 नोव्हेंबर) केडगाव शिवाजी नगर, गुरुवारी (दि.14 नोव्हेंबर) बालाजी कॉलनी केडगाव) येथे शिबीर होणार आहे. गुरुवारी नवनागापूरला शिबिराचे उद्घाटन होणार असून, या शिबिराचा समारोप 14 नोव्हेंबर रोजी केडगाव येथील बालाजी कॉलनी येथे होणार आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी शिबिराचे जिल्हा प्रतिनिधी खेमनर 9595401515 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.