कुटुंब नियोजनासाठी महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू!

👶🧠 "Smart Family, Strong Future!"

👶
🧠 “Smart Family, Strong Future!” – कुटुंब नियोजनासाठी महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू!

अहिल्यानगर | 13 जुलै –
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करत महानगरपालिका आरोग्य विभागाने लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन आणि सुरक्षित मातृत्वासाठी शहरभर जनजागृती मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम ११ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत राबवली जाणार आहे.

🏥 सुरक्षित मातृत्वाचा संकल्प!

या मोहिमेअंतर्गत बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील प्रसूतीगृहात मोफत नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
🗓️ वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
▪️ मंगळवार: पुरुष नसबंदी
▪️ बुधवार: स्त्री नसबंदी
▪️ गुरुवार: लॅप्रोस्कोपी व बिना टाक्यांची शस्त्रक्रिया

🎯 मोहिमेचे उद्दिष्ट –
✔️ १२ पुरुष नसबंदी
✔️ १८४ स्त्री नसबंदी व लॅप्रोस्कोपी

👨‍⚕️ या शस्त्रक्रिया डॉ. सतीश राजूरकर, डॉ. रेणुका पाठक, डॉ. वृषाली पाटील यांच्या देखरेखीखाली केली जाणार आहेत.


📣 “दोन मुलांवर थांबा, जबाबदारीने वागा” – डॉक्टरांचे आवाहन!

उद्घाटनप्रसंगी उपस्थित आरोग्य अधिकारी डॉ. राजूरकर, डॉ. रेणुका पाठक, डॉ. दिलीप बागल, डॉ. वृषाली पाटील, डॉ. शिल्या पाठक आणि डॉ. दीपमाला चव्हाण यांनी कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धती, फायदे आणि सुरक्षित मातृत्वाच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केलं.

🔍 डॉ. रेणुका पाठक म्हणाल्या, “वाढती लोकसंख्या ही आरोग्य संकटाचे मूळ कारण आहे. गर्भनिरोधक पद्धती योग्य वेळेत निवडल्यास मातामृत्यू, बालकांचे कुपोषण आणि अनावश्यक गर्भधारणा टाळता येतात.”


💬 “माहिती हवी? आशा ताईशी संपर्क साधा!”

महापालिकेच्या आशा वर्करकडून शस्त्रक्रियेसाठी नोंदणी व माहिती दिली जाणार आहे. हा मोहिमेचा लाभ घेऊन आपण आपल्या कुटुंबासाठी, आणि देशासाठी एक सकारात्मक पाऊल उचला!

 

#martFamily #PopulationDay2025 #FamilyPlanning #NirogiKutumb #MetroNewsUpdate #HealthAwareness #FreeSurgery