नाफेड कांदा खरेदी घोटाळा उघड! – शेतकऱ्यांना न्याय द्या : अनिल घनवट यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघड झाला असून, या संदर्भात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

पोलीस न्यूज नेटवर्क | श्रीगोंदा
नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघड झाला असून, या संदर्भात स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नाशिक फैयाज मुलानी यांच्या पथकाने २३ जुलै रोजी सिन्नर येथील दोन कांदा खरेदी केंद्रांची अचानक तपासणी केली. यामध्ये खरेदी केलेल्या कांद्याच्या वजनात व प्रत्यक्ष शिल्लक असलेल्या कांद्यामध्ये ४० ते ५० टक्क्यांची तफावत आढळली. त्यात मोठ्या प्रमाणावर काजळी लागलेला व कमी आकाराचा (४५ एमएम पेक्षा कमी) कांदा साठवलेला आढळून आला.
या केंद्रांवर साईझर नव्हते, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सातबारा उतारे आणि आवश्यक कागदपत्रे नव्हती. कांद्याचा दर्जाही एफए-क्यू नसल्याचे स्पष्ट झाले.
सरकारने शेतकरी संघटनांच्या मागणीनंतर १८ जुलै रोजी “दक्षता समित्या” नेमल्या होत्या, मात्र त्या समित्यांत एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही. अधिकाऱ्यांची कार्यपद्धती संथ असल्याने वेळेत अहवालही सादर केला गेला नाही.
यासंदर्भात घनवट म्हणाले,
“शासकीय अधिकाऱ्यांवर जनतेचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे प्रत्येक दक्षता समितीत किमान दोन शेतकरी प्रतिनिधी असावेत. दोषींवर तातडीने कारवाई व्हावी!”
शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, सरकारकडून पारदर्शकतेचा अभाव का? नाफेडच्या घोटाळेबाजांना अभय का?
आता वेळ आली आहे – शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याची!
हा मुद्दा शेवटपर्यंत पोहोचवा! शेअर करा, सवांद घडवा!