एलसीबी हप्ता वसुली अंदाजपत्रक खा.लंकेंकडून सादर
खासदार निलेश लंकेंचे पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप
अहमदनगर, शहरात गेल्या काही दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) भ्रष्ट कारभारा विरोधात खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरु आहे. हे उपोषण शहरातील पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर सुरु असुन शहरातील महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांचा संपुर्ण पाठींबा उपोषणास मिळत आहे. राज्याच्या गृह खात्याने खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास जिल्ह्यासह संपुर्ण राज्याभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला, तसेच पोलिस प्रशासनाचे प्रमुख व अधिकारी चर्चेसाठी आले नाही, प्रशासनाकडून उपोषणाची कोणताही दखल घेतली जात नाही. राज्याच्या गृह विभागाने खा. लंकेंच्या मागण्या मान्य कराव्या असे मत यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील गुन्हे शाखेच्या हप्ता वसुलीचे अंदाजपत्रक खासदार निलेश लंके यांनी उपोषणा वेळी सादर केले. जिल्ह्यात होणारी रेशनिंग, मटका, विना परवाना होटेल, कॅफे, बिंगो, अवैध वाळू उपसा, गुटखा विक्री व तस्करी, लोखंड- स्टील, चंदनतस्करी यासारखे इतर अवैध धंदे करणाऱ्यांकडुन स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी ३१ कोटींची वसुली करतात. या आधआरावर अवैध धंद्यांवर अंदाजे ३७२ कोटींची वार्षिक वसुली केली जाते. ही वसुली कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे असा प्रश्न यावेळी खा. लंके यांनी उपस्थित केला. तसेच जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांकडून दोन महिन्यात ३ कोटींची खंडणी वसुल केल्याचा आरोपही यावेळी खा. लंकेंनी केला आहे. तसेच पोलिस प्रशासनावर सत्ताधारी दबाव टाकत आहेत. त्यामुळे खा. लंके यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाही. अश्या चर्चांना कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले आहे. खासदार लंकेंनी केलेल्या आरोपाप्रमाणे कोणतीही वसुली केली जात नाही. असा प्रकार आढळुन आल्यास आरोपाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे वक्तव्य जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी केले. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, संदेश कार्ले, दिलीप सातपुते, बाळासाहेब हराळ, बाळासाहेब बोराटे, अशोक रोहकले, योगिराज गाडे आदी उपस्थित होते.