Now Every Gram Panchayat Expense is on Your Mobile!
आता गावात चालणाऱ्या विकासकामांचा लाईव्ह ट्रॅक ग्रामस्थांना मिळणार आहे!
Share
#DigitalVillage | आता ग्रामपंचायतीचा प्रत्येक खर्च तुमच्या मोबाईलवर!
संगमनेर : गावात किती पैसा आला? तो पैसा नेमका कुठे खर्च झाला? आणि खरंच तो कामासाठीच वापरला गेला का? हे जाणून घेण्यासाठी आता पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतीची पायरी चढण्याची गरज नाही. कारण शासनाने आणले आहे “ई-ग्रामस्वराज पोर्टल” आणि मोबाईल अॅप – ज्यामुळे प्रत्येक ग्रामस्थ थेट आपल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब पाहू शकतो.
या अॅपद्वारे काय मिळेल? गावात आलेल्या निधीची माहिती कोणत्या कामासाठी किती खर्च झाला? प्रत्यक्षात काम कुठपर्यंत आलंय? मंजूर निधी आणि प्रत्यक्ष खर्चाची तुलना
म्हणजेच आता गावात चालणाऱ्या विकासकामांचा लाईव्ह ट्रॅक ग्रामस्थांना मिळणार आहे!
हे कसं वापरायचं? गुगल प्ले स्टोअरवरून “ई-ग्रामस्वराज अॅप” डाउनलोड करा. तुमची भाषा निवडा. राज्य, जिल्हा, तालुका आणि त्यानंतर गावाचं नाव निवडा. लगेचच तुम्हाला गावातील निधी आणि खर्चाची सगळी माहिती स्क्रीनवर दिसेल.
ग्रामपंचायतींना दरवर्षी वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळतो. पण हा पैसा खरंच योग्य पद्धतीने वापरला जातो का? याचा मागोवा घेणं ग्रामस्थांसाठी आता सोपं झालं आहे. उदाहरणार्थ – गावात एखादं रस्त्याचं काम सुरू आहे तर त्या कामासाठी किती निधी मंजूर झाला, किती खर्च झाला आणि सद्यस्थिती काय आहे – हे सर्व ग्रामस्थ आपल्या मोबाईलवर पाहू शकतात.
अॅड. ज्ञानेश्वर कांदळकर म्हणाले –
“ग्रामस्थांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यायला हवा. कारण आलेला निधी खरोखर त्याच कामावर आणि त्याच ठिकाणी खर्च झाला आहे का, हे पाहणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
एकूणातच, ई-ग्रामस्वराज पोर्टल आणि मोबाईल अॅपमुळे ग्रामपंचायती पारदर्शक होत आहेत. आता गावाचा हिशोब गावकऱ्यांच्या बोटांवर!
तुमच्या मते, या डिजिटल सोयीमुळे गावाच्या विकासाला गती मिळेल का?
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची माहिती गावातल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा!