जुना वाद, नवा घाव! लोणी येथे तरुणावर जीवघेणा हल्ला
खर्डा पोलिसांची आरोपींना तात्काळ अटक 🚔
जुना वाद, नवा घाव! लोणी येथे तरुणावर जीवघेणा हल्ला – खर्डा पोलिसांची आरोपींना तात्काळ अटक ![🚔]()
जामखेड तालुक्यातील लोणी गावात थरारक घटना!
८ जुलै रोजी आनंदनवाडी शिवारात जुन्या भांडणाचा राग मनात धरत, शिवाजी पवार या तरुणावर दोन जणांनी थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
फिर्यादी शिवाजी पवार हे आपल्या दोन मित्रांसोबत शिवारात गेले असताना, भाऊसाहेब परकड व भागवत लंगडे या दोघांनी त्यांना जबरदस्तीने दारू पिण्यास लावण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ सुरू केली.
पण खरी घटना तेव्हाच घडली, जेव्हा हे तिघे परत घरी निघाले होते.
लोणीच्या वाकी रोडवर, गाडी थांबवून आरोपींनी “किती वेळ झाला?” असे विचारून शिवाजी पवार याच्याशी पुन्हा वाद घातला.
मग काय – माघील भांडणाच्या रागातून, या दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
भाऊसाहेब परकड याने गाडीच्या चावीलाच धारधार शस्त्रासारखे वापरून, थेट पवार यांच्या गळ्यावर हल्ला केला! 
गंभीर जखमी अवस्थेत शिवाजी पवार यांना त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ भगवंत हॉस्पिटल, खर्डा येथे दाखल केले.
याबाबत खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे –
गु.र.नं. 116/2025 कलमे 109(1), 115(2), 352, 3(5) अंतर्गत कारवाई सुरू आहे.
पोलीसांची तात्काळ कारवाई – आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली खर्डा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ शोधमोहीम राबवली आणि अवघ्या काही तासांत आरोपी भाऊसाहेब परकड व भागवत लंगडे यांना अटक केली!
या ऑपरेशनमध्ये सहभागी –
PI उज्वलसिंह राजपूत
पोलीस अंमलदार संदिप धामने, संभाजी शेंडे, शशी म्हस्के
आणि त्यांच्या टीमचा उल्लेखनीय सहभाग!
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, व SDPO गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.


पोलीसांची तात्काळ कारवाई – आरोपींच्या मुसक्या आवळल्या!