ओंकार कॉम्प्युटरचा हळदी कुंकू आणि ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा सोहळा संपन्न

विशेष आकर्षण ठरले 'होम मिनिस्टर'

भिंगार: ओंकार कॉम्प्युटर संस्थेच्या परंपरे नुसार यंदा अत्यंत उत्साहात हळदी कुंकु कार्यक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेने भव्य हळदी कुंकू समारंभ आणि विशेष आकर्षण ठरलेल्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण भिंगारकरांनी या सोहळ्याचा आनंद घेतला.
यंदाच्या सोहळ्यात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पारंपरिक रितीरिवाज पाळत उत्साहाने महिलांनी सहभाग घेतला. विविध खेळ आणि आनंदाच्या वातावरणात हळदी कुंकूचा सोहळा रंगला. त्याचबरोबर उपस्थित महिलांना सुंदर भेटवस्तू आणि संस्थेच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण केंद्रबिंदू म्हणजे ‘होम मिनिस्टर’ शोचे आयोजन होते. या शोमध्ये महिलांनी विविध खेळ खेळले आणि उत्तम कौशल्य दाखवून बक्षिसांची लयलूट केली. शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्र संचालक रूपेश पसपूल यांनी केले आणि त्याच्या खुमासदार शैलीने उपस्थित प्रेक्षकांना खळखळून हसवले. यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
कार्यक्रमास भिंगार शहरातील अनेक मान्यवर महिला देखील उपस्थित होत्या. या वेळी ओंकार कॉम्प्युटर संस्थेच्या शिक्षिका अंजली कोल्हाल , अनिता सुरसे, उपासना कनोजिया, तमन्ना शेख, मेघा धन्डारे, प्रियंका भोकरे, रेणुका शिंदे, यांनी दिलेल्या योगदाना मुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.
कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आनंदाने सहभाग घेतला आणि त्यांचे सकारात्मक अभिप्राय दिले. काही महिलांनी सांगितले की, “ओंकार कॉम्प्युटरने केवळ तंत्रशिक्षणच दिले नाही, तर समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरतात.”
`संस्थेचे प्राचार्य शीतल भुतकर यांनी सांगितले की, “ओंकार कॉम्प्युटर पुढील काळात अद्ययावत अभ्यासक्रम आणण्याचा विचार करत आहे. डिजिटल मार्केटिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाउड कॉम्प्युटिंग अशा अत्याधुनिक कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर तयार करणे हा आमचा उद्देश आहे.”
या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने ‘होम मिनिस्टर’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमामुळे आणि हळदी कुंकूच्या पारंपरिक सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
संस्थेच्या या नव्या टप्प्यावर अनेक शुभेच्छा देत उपस्थितांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि ओंकार कॉम्प्युटरच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली.