एकच इमारत – चार कॉलेजेस? मोठा घोटाळा उघड! साकत (जामखेड) येथे डॉ. सुहास आणि डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी एकाच इमारतीवर, बनावट कागदपत्रांच्या आधारे नर्सिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक यांसारख्या चार कॉलेजसाठी मंजुरी घेतल्याचा गंभीर आरोप!
कागदोपत्री शिक्षक – प्रत्यक्षात शून्य! फक्त दाखवण्यासाठी कर्मचारी, खोटे प्रवेश आणि विद्यार्थ्यांच्या नावावर शिष्यवृत्तीचा गैरवापर!

साकत (जामखेड) येथे डॉ. सुहास आणि डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी एकाच इमारतीवर, बनावट कागदपत्रांच्या आधारे नर्सिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक यांसारख्या चार कॉलेजसाठी मंजुरी घेतल्याचा गंभीर आरोप!
कागदोपत्री शिक्षक – प्रत्यक्षात शून्य!
फक्त दाखवण्यासाठी कर्मचारी, खोटे प्रवेश आणि विद्यार्थ्यांच्या नावावर शिष्यवृत्तीचा गैरवापर!
महात्मा फुले योजनेतही करोडोंचा घोटाळा!
इंदिरा हॉस्पिटल, जामखेडमधून शासनाच्या योजनेतून कोट्यवधी उचलून साकत येथे घेतली अवैध संपत्ती!
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचा आरोप –
“११ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, जर कारवाई न झाली तर!”
प्रश्न फक्त शिक्षण व्यवस्थेचा नाही, तर सार्वजनिक पैशांच्या लूटपाटीचा आहे!
सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी जनतेची मागणी!