यंदा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होणार!

नव्या शैक्षणिक वर्षापासून  मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, नाशिक शहरातच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थाचालकांच्या विरोधामुळे ऑनलाइनऐवजी पारंपरिक पद्धतीनेच प्रवेश होत होते. आता सर्वच ठिकाणी ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहेत.