अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक!
विधान भवनाच्या पायऱ्यांवर ‘मी मराठी’ नारेबाजी बावनकुळेंनाही घातली "मी मराठी" टोपी!
c
विधान भवनाच्या पायऱ्यांवर ‘मी मराठी’ नारेबाजी
बावनकुळेंनाही घातली “मी मराठी” टोपी!
३० जून २०२५ | स्थान: मुंबई –
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पण पहिल्याच दिवशी विरोधक सरकारवर तुटून पडले! विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) यांनी ‘मी मराठी’ टोप्यांच्या माध्यमातून मराठी अस्मितेचा जोरदार मुद्दा उपस्थित केला.
अंबादास दानवे यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘मी मराठी’ टोपी घालून दिली – आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला!
यानंतर आदित्य ठाकरे व बावनकुळे यांच्यात हस्तांदोलनही झाले, ज्यामुळे क्षणभर शांततेचं दृश्य दिसलं.
‘मी मराठी’ टोपी घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसलेले ठाकरे गटाचे आमदार
उपस्थित नेते: भास्कर जाधव, अजय चौधरी, अंबादास दानवे
उद्धव ठाकरे देखील लवकरच विधानभवनात दाखल होणार
दुसरीकडे सभागृहात:
- छगन भुजबळ यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिला
- नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश सादर
- २०२५-२६ ची पुरवणी मागणी मांडली
- शोक प्रस्तावानंतर दिवसाचं कामकाज समाप्त
विरोधकांचा सुर आक्रमक, मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थानी – यंदाचं अधिवेशन वादळी ठरण्याची स्पष्ट चिन्हे!

विधान भवनाच्या पायऱ्यांवर ‘मी मराठी’ नारेबाजी
बावनकुळेंनाही घातली “मी मराठी” टोपी!