Beed जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात राजकारणाचं तापमान FULL
Share
Pandit Vs Hake : राजकारणात घमासान!
Beed जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात राजकारणाचं तापमान FULL ऑन झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार विजयसिंह पंडित विरुद्ध ओबीसी नेते लक्ष्मण हाके असा थेट संघर्ष उफाळून आला आहे. गेवराई शहर सलग दुसऱ्या दिवशी रणांगणात बदललं असून समर्थकांमध्ये जोरदार तणाव निर्माण झालाय.
सुरुवात झाली ओबीसी समाजाच्या एका बैठकीतून, जिथं हाके यांनी आमदार पंडित यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर पंडित समर्थक संतापले आणि छत्रपती संभाजी महाराज चौकात हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं. आंदोलनकर्त्यांनी पुतळ्याला दंडुके मारून आग लावली आणि जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
यावर आमदार विजयसिंह पंडित यांनीही थेट शब्दबाण सोडले. त्यांनी लक्ष्मण हाके यांना “श्वान” म्हणत जोरदार टीका केली. पंडित म्हणाले –
“लक्ष्मण हाके हा दलाल श्वान आहे, स्ट्रीट डॉग आहे, रिचार्जवाला डॉग आहे. मंत्रालयात दलाली करणारा हा प्रीपेड श्वान आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. 2024 च्या निवडणुकीत याने माझ्या विरोधात प्रचार केला, पण माझ्या विरोधकाचा डिपॉझिट जप्त झाला. लोकांनी याला ओळखलंय.”
पंडित यांच्या या स्फोटक विधानानंतर हाके यांनीही पलटवार करत अजित पवार गटावर थेट निशाणा साधला. त्यांनी सांगितलं की –
“अजित पवार आतून मनोज जरांगे यांना सपोर्ट करत आहेत. आमदार त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात, हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का? मराठा आरक्षणाकडे सत्ताधारी दुर्लक्ष करतायत, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. माझ्या पुतळ्याचं दहन केलं जातंय पण मी स्वतः गेवराईला जाणारच. माझं खुले आव्हान आहे – बघू कोण मला थांबवतं!”
एवढंच नाही तर, पंडित समर्थकांनी हाके यांचा पुतळा जाळल्यानंतर हाके समर्थकांनी प्रत्युत्तरात त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला आणि आपला रोष व्यक्त केला.
सध्या गेवराई शहरात तणावाचं वातावरण आहे. पंडित विरुद्ध हाके संघर्ष आता अजून पेटण्याची चिन्हं दिसतायत. दोन्ही बाजूंनी समर्थक आक्रमक असल्यामुळे या संघर्षाचं रूप आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
राजकारणात वैचारिक मतभेद असतातच, पण आता हा वाद शब्दयुद्ध + रस्त्यावरचं आंदोलन या पातळीवर पोहोचला आहे.
पुढे याचं काय रूप घेणार? हे पाहण्यासाठी संपूर्ण राज्याची नजर गेवराईवर खिळली आहे!