“पारनेरला मिळणार ‘फायर पॉवर’!
सुपा एमआयडीसीत उभं राहतंय आधुनिक अग्निशमन केंद्र!”
सुपा, पारनेर तालुका | नगर सह्याद्री
पारनेरकरांनो, आता आगीच्या संकटावर मिळणार ‘फुल कंट्रोल’!
सुपा एमआयडीसीत उभारलं जात असलेलं अत्याधुनिक अग्निशमन केंद्र लवकरच प्रत्यक्षात येणार आहे आणि सध्या त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. ८०% हून अधिक काम पूर्ण! 

या सुविधेमुळे काय बदलणार?
संपूर्ण पारनेर तालुक्यासाठी हे केंद्र ठरेल वरदान!
२८ अग्निशमन जवान आणि २ अधिकारी राहण्यासाठी स्वतंत्र निवास
२ अग्निबंब गाड्या, १ अॅम्बुलन्स आणि बोलेरो जीप सज्ज
पुढच्या टप्प्यात अजून वाहने आणि सुविधांचा समावेश होणार
२ एकरवर पसरलेलं मजबूत आणि व्यावसायिक पायाभूत बांधकाम
३० जुलै रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी:
कामाची गुणवत्ता आणि वेग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं.
याच वेळी सागर मैड यांनी आमदार काशीनाथ दाते यांचाही संपर्क अधिकाऱ्यांशी साधून दिला.
“अग्निशमन केंद्र लवकरच लोकसेवेसाठी सुरू होणार” – अधिकृत आश्वासन
पार्श्वभूमी:
२०१७ पासून सुपा परिसरासाठी फायर स्टेशनची मागणी सातत्याने सागर भास्करराव मैड करत होते. अभ्यासपूर्ण मागणी, योग्य ठिकाणी पाठपुरावा आणि नेत्यांचं सहकार्य यामुळे हा प्रकल्प साकारतोय.
यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठे योगदान आहे
