सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित आणि आडसूळ एज्युकेशन कॅम्पस आयोजित “महिला सबलीकरण व सक्षमीकरण” या एका दिवसाच्या स्पेशल वर्कशॉपने कॅम्पस अक्षरशः रंगून गेला!
अहिल्यानगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित आणि आडसूळ एज्युकेशन कॅम्पस आयोजित “महिला सबलीकरण व सक्षमीकरण” या एका दिवसाच्या स्पेशल वर्कशॉपने कॅम्पस अक्षरशः रंगून गेला!
या वर्कशॉपच्या इनॉग्रेशनला न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर डॉ. चेतना बहुरुपी (पाटील), आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अंजली वल्लाकुट्टी, पीएसआय प्रियंका आठरे, प्रा. अनिरुद्ध आडसूळ, डॉ. लीना आडसूळ, कृष्णा आडसूळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कॅम्पस डायरेक्टर डॉ. प्रदिप एम. पाटील यांनी महिला सक्षमीकरणाबाबत महत्त्वाचे विचार मांडत “पुणे विद्यापीठाच्या पाठबळामुळे हे शक्य झाले” असे सांगितले.
वर्कशॉपचा हायलाइट – ३ पॉवरपॅक्ड सेशन्स!
पहिले सेशन – भारताची पहिली आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अंजली वल्लाकुट्टी यांनी मुलींना सेल्फ-डिफेन्सचे टिप्स आणि प्रॅक्टिकल डेमो दिले. “आत्मविश्वास ठेवा, कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार रहा” असा पॉवरफुल संदेश त्यांनी दिला.
दुसरे सेशन – पीएसआय प्रियंका आठरे यांनी सायबर क्राईम आणि महिला संरक्षण कायदे यावर मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा योग्य वापर, मुलींचे हक्क, सरकारी सुविधा व योजना यावर सखोल चर्चा झाली.
तिसरे सेशन – डॉ. चेतना बहुरुपी यांनी महिला आरोग्य व लाइफस्टाइल या विषयावर हेल्दी टिप्स दिल्या. संतुलित आहार, व्यायाम, झोप आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगून त्यांनी मुलींना हेल्थ कॉन्शस राहण्याचा सल्ला दिला.
वर्कशॉपमध्ये इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, डी फार्मसी, बी फार्मसी, एमबीए, लॉ, आर्ट्स- कॉमर्स- सायन्स अशा विभागातील तब्बल ८१९ मुली व महिला कर्मचारी सहभागी झाल्या!
या शानदार वर्कशॉपमुळे आडसूळ कॅम्पस मध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा माहोल तयार झाला. दरवर्षी अशा वर्कशॉपचे आयोजन करणार असल्याची घोषणा डायरेक्टर डॉ. प्रदीप पाटील यांनी केली.
प्रा. पूजा साठे यांनी छान सूत्रसंचालन केले तर प्रा. पी.व्ही. कंधारे यांनी आभार मानले.
या इव्हेंटचे फोटो आणि अपडेट्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत!