रविराज चव्हाण बनला ‘गोदड महाराज किताब’चा मानकरी!
चितपट केलं सत्यपाल सोनटक्के यांना – पटकावली 2 किलो चांदीची गदा!

चितपट केलं सत्यपाल सोनटक्के यांना – पटकावली 2 किलो चांदीची गदा!
कर्जत | पोलिस न्यूज नेटवर्क
कर्जतमधील श्री संत गोदड महाराज रथयात्रा म्हणजे थेट पॅशन!
या उत्सवात पार पडलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत पै. रविराज चव्हाणनं बाजी मारली आहे!
सत्यपाल सोनटक्के यांना ‘लंगडी’ डावात चितपट करत
रविराजने मिळवला श्री संत गोदड महाराज किताब आणि 2 किलो चांदीची गदा! 

हगामा LIVE – कुस्तीचा थरार, गगनभेदी जल्लोष!
दरवर्षी रथयात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या हगाम्यात यंदा प्रचंड गर्दी आणि थरारक कुस्त्या पाहायला मिळाल्या.
उद्घाटन: ओंकार पाटील (अध्यक्ष मेघनाथ पाटील यांच्या हस्ते)
रामभाऊ धांडे स्मरणार्थ स्पर्धा – ठिकाण: कै. दिलीप नाना तोरडमल क्रीडा संकुल
हायलाईट कुस्त्या:
- प्रशांत जगताप vs शुभम कोळेकर – महाराष्ट्र केसरी प्रशांतने डाव-पटके करत कोळेकरला दिली मात!
- श्रीमंत भोसले vs श्री पाथरूड – सामना बरोबरीत सुटला
- हर्षवर्धन पठाडे (कर्जत) vs गोवर्धन शिंदे (अहिल्यानगर) – पठाडेचा दमदार विजय
- धुळाजी इरकर, भैया शेळके, गिरीश गोडसे – यांचाही अभिनयात फिनिश!
गदेवर ‘रविराज’ची मोहर!
धांडे वाडी ग्रामस्थ आणि धांडे कुटुंबाच्या वतीने
“2 किलो चांदीची गदा” ही प्रतिष्ठेची बक्षीस वर्षातून एकदाच!
या वर्षीची गदा रविराज चव्हाण याने मिळवली – खऱ्या अर्थानं स्टार परफॉर्मर!
कुस्ती व्यवस्थापन 5 स्टार!
नियोजन: पै. किरण नलवडे, पै. ऋषिकेश धांडे
पंच: प्रविण घुले, नामदेव राऊत, शिवाजी धांडे, प्रशांत पाटील आणि टीम
स्पॉन्सरिंग व आर्थिक बाजू पारदर्शक! – बप्पाजी धांडे, सुरेश खिस्ती, दत्ता शिंदे आणि टीम यांचा सक्रिय सहभाग
कर्जतच्या मातीतून उगमलेली ताकद आणि परंपरेची शान!
“श्री संत गोदड महाराज किताब 2025” = रविराज चव्हाण
पुढच्या वर्षी कोण असेल चॅम्पियन? बघूया… पण आतासाठी – रविराज साठी एक जोरदार टाळी!